Thur, March 23, 2023

वारीशे मृत्यू प्रकरणी २० मार्चला सुनावणी
वारीशे मृत्यू प्रकरणी २० मार्चला सुनावणी
Published on : 15 March 2023, 2:48 am
वारीशे मृत्यू प्रकरणी
२० मार्चला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरच्या जामिन अर्जावर आता २० मार्चला सुनावणी होणार आहे. संशयित आंबेरकरच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पंढरीनाथच्या जामिन अर्जावर सुनावणी सोमवारी २० मार्चला करण्यात येणार असल्याचे जाहिर केले.