बेवारस महिलांची आश्रमात रवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेवारस महिलांची आश्रमात रवानगी
बेवारस महिलांची आश्रमात रवानगी

बेवारस महिलांची आश्रमात रवानगी

sakal_logo
By

बेवारस महिलांची आश्रमात रवानगी
सावंतवाडी ः शहरात फिरणाऱ्या दोन वृद्ध बेवारस महिलांची अखेर आज संविता आश्रमात रवानगी करण्यात आली. दीड वर्षांहून अधिक काळ त्या येथील एका कॉम्प्लेक्स परिसरात वास्तव्य करत होत्या. त्यातील एका महिलेचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्यामुळे त्याचा त्रास तेथील दुकान व्यवसायिकांना सहन करावा लागत होता. याबाबतची माहिती काहींनी संविता आश्रमाचे प्रमुख संदीप परब यांना दिली. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सावंतवाडीत येत त्या महिलांना आश्रमात नेऊन आश्रय दिला. यावेळी संविता आश्रमाचे कर्मचारी जानवी आंगणे, लीना पारकर, ज्योती आंगणे, केविन डिसोजा, उदय कामत, अक्सर अली आदींसह त्यांना आश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश रेगे, विठ्ठल कदम, दत्तप्रसाद फोंडेकर, रवी जाधव, सुधीर पराडकर आदी उपस्थित होते.