
पावस-गावडेआंबेरे-पूर्णगडला जोडणारा बंधारा झाला मजबूत
rat१६१३.txt
(२५ फेब्रुवारी टुडे एक कात्रण वापरावे)
सकाळ बातमीचा परिणाम---लोगो
फोटो ओळी
- rat१६p२.jpg-
८९३८६
पावस ः गावडेआंबेरे- पूर्णगड दरम्यानच्या या खारभूमी बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
-
खारभूमी बंधारा झाला मजबूत
गावडेआंबेरे-पूर्णगड जोडणारा मार्ग ; सुरक्षेसाठी रेलिंग ; कॉक्रिंटीकरणामुळे वाहतूक सुलभ
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ ः तालुक्यातील गावडेआंबेरे, बिर्जेवाडी आणि पूर्णगड यांना जोडणारा खारभूमी बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. याबाबत दैनिक ‘सकाळ’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या बंधाऱ्या दोन्ही बाजूला रेलिंग बसवून सुरक्षित करण्यात आले असून या बंधाऱ्यावर कॉंक्रिटीकरण करून मजबुतीकरण करण्यास सुरवात झाली आहे.
या बंधाऱ्याचे खारेपाणी थांबवण्यासाठी टाकण्यात आलेल्या कॉजवेवर खड्डे पडल्यामुळे बंधारा धोकादायक बनला होता. दिवसेंदिवस रस्ता खचत चालला होता. त्यामुळे बंधारा कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता होती.
गावडेआंबेरे, बिर्जेवाडी, मावळंगे, जांभूळआड, नातुंडे आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसत असल्यामुळे जमिनी नापिक झाल्या होत्या. त्या सुस्थितीत करण्याकरिता खारभूमी खात्याने या परिसरात बंधारा बांधल्यामुळे अनेक जमिनी सुपिक बनल्या आहेत. या बंधाऱ्याचा फायदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना झाला. या बंधाऱ्याची झडपे स्वयंचलित असल्यामुळे खारेपाणी आतमध्ये घुसत नव्हते व पुराचे पाणी आपोआप खाडीमध्ये जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाची बाब होती. ५०-६० एकर परिसर लागवडीस योग्य झाला होता. त्याचबरोबर या बंधाऱ्यामुळे काही दुचाकी चालकांना अंतर जवळचे ठरत असल्यामुळे या मार्गाचा अवलंब प्रामुख्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात केला जात होता. कारण मुख्य मार्गावरील सातपऱ्या पुलावर पाणी येत असल्याने पावसाळ्यात येथील वाहतूक ठप्प होत होती. त्यावेळी या बंधाऱ्याचा वापर वाहनचालकांना होत होता.
‘सकाळ’ च्या वृत्ताची दखल
या मार्गावरील वाहतूक वाढल्याने या बंधाऱ्यावर खड्डे पडले होते. याबाबत ‘सकाळ’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर खारभूमी खात्याच्या अधिकाऱ्याने तातडीने लक्ष देऊन या कॉजवेवर दोन्ही बाजूला सुरेक्षेच्या दृष्टीने रेलिंग लावले आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून जाताना जे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ते आता दूर होणार आहे. या कॉजवेवर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे मजबुतीकरण होण्यास मदत होणार आहे.
--