देवळे हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवळे हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांची मदत
देवळे हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांची मदत

देवळे हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांची मदत

sakal_logo
By

rat१६१४.txt

बातमी क्र.. १४ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त पट्टा)

देवळे हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांची मदत

साखरपा ः देवळे येथील हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी शाळेला ८३ हजारांची रोख देणगी दिली. देवळे हायस्कूलच्या १९७८-७९ च्या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन हायस्कूलमध्ये पार पडले. याच बॅचचे माजी विद्यार्थी असलेले उद्योजक नीलेश कोळवणकर आणि लेखक शरद साडविलकर यांनी शाळेला रोख ८३ हजारांची देणगी दिली. आपण या शाळेमुळे घडलो त्यामुळे या ऋणातून उतराई होण्याच्या भावनेतून आपण ही देणगी देत असल्याचे दोघांनी सांगितले. या रक्कमेचा विनियोग शाळेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी व्हावा आणि शाळेची गुणवत्ता आणखी सुधारावी यासाठी व्हावा अशी अपेक्षा दोघांनीही व्यक्त केली. या वेळी माजी विद्यार्थी आणि काजू उद्योजक प्रकाश चाळके, शिक्षक दीपक गुरव, विजय कांबळे, रवींद्र आठल्ये यांनी त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव कथन केले. संस्थाध्यक्ष नीलेश कोळवणकर, सचिव डॉ. अशोक गार्डी, अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी देणगीदारांचे आभार मानले.
-
साखरपा परिसरात हलका पाऊस

साखरपा ः साखरपा गाव आणि परिसरात बुधवारी (ता. १५) रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे बागायतदारांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. गेले दोन दिवस या परिसरात मोठ्या प्रमाणावर मळभ होते. रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक पावसाला सुरवात झाली. सुमारे १५ मिनिटे मध्यम हलका पाऊस या परिसरात पडला. साखरपा गाव तसेच कोंडगाव, मेढे, दाभोळे, कनकाडी या गावांमध्ये हा पाऊस पडला. या परिसरात काजू काढणीला वेग आला आहे. तसेच आंब्याला फळधारणा होऊन माध्यम आकाराची कैरी धरली आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे या कैरीवर काय परिणाम होईल या चिंतेत बागायतदार आहेत.
-

पाककला स्पर्धेत प्रा. तौफिन पठाण प्रथम

रत्नागिरी ः चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठ येथे पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रा. तौफिन पठाण यांनी प्रथम, सुरज पाटील द्वितीय आणि तृतीय क्रमांक नितीन बोरे यांनी पटकावला. ही स्पर्धा विशेषतः महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आयोजित करण्यात आली होती. स्पर्धकांनी पदार्थ घरी बनवून आणून परिक्षकांसमोर सादर करायचे होते. पदार्थाची चव, कृती, सजावट आणि सादरीकरण यावरून स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले. सर्व स्पर्धकांनी उत्तम सादरीकरण केले. विशिष्ट घटक व पदार्थाचे ठराविक स्वरूप याबद्दल काही अटी नसल्यामुळे विविध प्रकारचे पदार्थ स्पर्धकांनी बनवून आणले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रत्नागिरी उपपरिसरच्या शिक्षकेतर कर्मचारी अश्विनी खडपकर व मधुरा कदम या लाभल्या. परिक्षकांनी पदार्थांची चव घेऊन, प्रश्न विचारून परिक्षण केले. विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा रत्नागिरी उपपरिसराचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर आणि उपकुलसचिव अभिनंदन बोरगावे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
-