
फो़टोसंक्षिप्त-वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
फोटो संक्षिप्त
टीपः swt१६२४.jpg मध्ये फोटो आहे.
वेंगुर्ले ः वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वेशभूषा स्पर्धेतील
विजेत्यांचा गौरव
वेंगुर्ले ः येथील मदर तेरेसा स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त तीन गटांत घेतलेल्या तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना स्पर्धेचे परीक्षक अनिता रॉड्रिग्ज, श्रेया मयेकर व प्रार्थना हळदणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांतून स्त्रियांचे महत्त्व व आदरभाव व्यक्त केला. रॉड्रिग्ज यांनी पालक व मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक अॅन्थोनी डिसोजा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
गुढीपाडव्यानिमित्त
देवगडात शोभायात्रा
देवगड, ता. १६ ः येथील देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवारी (ता. २२) दुपारी ४.३० वाजता शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. देवगड किल्ला ते स्वामी समर्थ मंदिर असा याचा मार्ग असेल. या दिंडीत चित्ररथ, ढोलपथक, लेझीम पथक, कराटे प्रात्यक्षिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.