हत्ती प्रश्नासंदर्भात 1 1 एप्रिलला उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्ती प्रश्नासंदर्भात 1 1 एप्रिलला उपोषण
हत्ती प्रश्नासंदर्भात 1 1 एप्रिलला उपोषण

हत्ती प्रश्नासंदर्भात 1 1 एप्रिलला उपोषण

sakal_logo
By

swt१६३६.jpg
L८९५७३
दोडामार्गः वन विभाग अधिकाऱ्यांना उपोषणाचे निवेदन देताना हत्तीमुक्त तिलारी खोरे समितीचे पदाधिकारी.
(छायाचित्रः संदेश देसाई)

हत्ती प्रश्नासंदर्भात १ एप्रिलला उपोषण
तिलारी खोरे समितीः वन विभागाच्या विरोधात आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १६ ः तिलारी खोऱ्यात रानटी हत्ती नुकसान करीत आहेत. हत्तींना पकडण्यासाठी वन विभाग तसेच शासन स्तरावरून कोणतीही मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे १ एप्रिलला दोडामार्ग वन विभाग कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा हत्तीमुक्त तिलारी खोरे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तिलारी खोऱ्यात वीस वर्षांपूर्वी हत्तींनी हजेरी लावली. तेव्हापासून ते आतापर्यंत नुकसान सत्र सुरूच आहे. मांगेली, हेवाळे, तेरवण-मेढे, घोटगेवाडी, मोर्ले, केर-भेकुर्ली या ग्रामपंचायत क्षेत्रांत हत्तींनी उच्छाद मांडला असून गेल्या वीस वर्षांत शासन स्तरावरून वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. हत्तींच्या मार्गावर लोखंडी खांब उभारणे, खंदक खोदणे, सौर कुंपण उभारणे, मिरची पूड दोरखंड, अग्निबाण, फटाके, ढोल वाजवून हत्तींना रोखणे तसेच हत्ती पकड मोहीम राबविणे यासारख्या अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या; मात्र सर्व उपाययोजना कूचकामी ठरल्याने हत्तींना हाकलणे कठीण झाले आहे. त्यांच्या त्रासामुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून तयार केलेली शेती-बागायती हत्तींमुळे नासधूस होऊन प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
य़ाबाबत ३ मार्चला सर्व हत्तीबाधित गावांतील आजी-माजी सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन तिलारी खोरे हत्तीमुक्त समिती स्थापन केली. पत्रकार परिषद घेऊन वन विभाग तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु आजपर्यंत याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात शासन स्तरावर कोणतेही पाऊल न उचलल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे १ एप्रिलला येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा हत्तीमुक्त तिलारी खोरे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वन विभागाला दिला आहे. यावेळी प्रेमानंद देसाई, तेजस देसाई, प्रवीण गवस, सोनाली गवस, साक्षी देसाई, समीर देसाई आदी उपस्थित होते.