
चौके ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधीचे पत्र
89876
चौके ः निधीचे पत्र सरपंच गोपाळ चौकेकर यांच्याकडे सुपूर्द करताना आमदार वैभव नाईक.
चौके ग्रामपंचायत इमारत
बांधकामासाठी निधीचे पत्र
आमदार नाईकांची दखल; १० लाखांचा निधी
मालवण, ता. १८ : आमदार वैभव नाईक यांनी मालवण मतदारसंघातील चौके ग्रामपंचायत इमारत, सभागृह बांधण्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधी २०२२-२३ अंतर्गत १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबतचे पत्र चौकेचे सरपंच गोपाळ चौकेकर यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी चौकेचे उपसरपंच पी. के. चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, सामाजिक कार्यकर्ते बिजेंद्र गावडे, अजित पार्टे उपस्थित होते. गेली काही वर्षे शासकीय जागेत असलेल्या चौके ग्रामपंचायत इमारत जागेचा वाद, कोर्टाचा निकाल व त्यानंतर निधीअभावी इमारतीचे बांधकाम थांबले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गाव पॅनेलने ही सुसज्ज इमारत बांधणे हा विषय प्रामुख्याने घेतला. सरपंच गोपाळ चौकेकर व गाव पॅनेल यांनी निधीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. यासाठी नाईक यांनी आपला स्थानिक निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यासाठीचे पत्र चौके सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्याकडे सुपूर्द केले. या पलीकडे इमारतीसाठी लागणारा निधी अन्य लोकप्रतिनिधींकडून उपलब्ध करून लवकरच ग्रामपंचायत इमारत उभी राहणार असल्याचे सरपंच चौकेकर यांनी सांगितले.