मडुरा सहकारी सोसायटीची आज पंचवार्षिक निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुरा सहकारी सोसायटीची
आज पंचवार्षिक निवडणूक
मडुरा सहकारी सोसायटीची आज पंचवार्षिक निवडणूक

मडुरा सहकारी सोसायटीची आज पंचवार्षिक निवडणूक

sakal_logo
By

मडुरा सहकारी सोसायटीची
आज पंचवार्षिक निवडणूक
बांदा, ता. १८ ः मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक उद्या (ता. १९) होत आहे. भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनल आणि श्री देवी माऊली आदर्श शेतकरी सहकार उत्कर्ष पॅनल यांच्यात दुरंगी लढत होत आहे. दोन्ही पॅनलकडून निवडणूक प्रचार यंत्रणा यशस्वीपणे राबविल्याने कडवी लढत होण्याची शक्यता आहे.
मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे कार्यक्षेत्र मडुरा, रोणापाल, निगुडे गाव मर्यादित आहे. १३ संचालक संख्या असलेल्या सोसायटीत भाजप पुरस्कृत पॅनलचे अनुसूचित जाती जमाती मतदार संघाचे उमेदवार देवू कोळापटे हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे १२ संचालक जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संस्थेचे एकूण ९१९ सभासद मतदार आहेत. भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनेलकडून ज्ञानेश परब, सुरेश गावडे, आत्माराम गावडे, उदय देऊलकर, लाडू परब, दत्ताराम परब, सुकाजी मोरजकर, शामराव म्हाडगुत, जयराम गवंडे, अर्चना परब, सुविधा धुरी, पुंडलिक जाधव रिंगणात आहेत. तर श्री देवी माऊली आदर्श शेतकरी सहकार उत्कर्ष पॅनेलकडून गोपाळ धुरी, गणेश गावडे, वसंत गावडे, शिवा नाईक, सोमा नाईक, जगन्नाथ परब, संतोष परब, उल्हास परब, लक्ष्मी भाईप, सुनंदा परब, राजेश मयेकर, लिंगाजी जाधव हे उमेदवार नशीब आजमावत आहेत.