‘आरटीई’ प्रवेश अर्जांसाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरटीई’ प्रवेश अर्जांसाठी 
२५ मार्चपर्यंत मुदतवाढ
‘आरटीई’ प्रवेश अर्जांसाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

‘आरटीई’ प्रवेश अर्जांसाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

‘आरटीई’ प्रवेश अर्जांसाठी
२५ मार्चपर्यंत मुदतवाढ

मालवण, ता. १८ : २०२३-२४ या शैक्षणिक हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकानुसार २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याने पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात बार्टीच्या समतादुतांमार्फत आरटीई प्रवेशाचे फॉर्म विनामूल्य भरले जात असून पालकांनी तालुक्यातील समतादुतांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
२०२३-२४ या शैक्षणिक हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकानुसार २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी १ ते १७ मार्च अशी मुदत दिली होती. जिल्ह्यात विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीत प्रवेश घेणाऱ्या दुर्बल व वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे; परंतु नेटवर्क व सर्व्हर समस्यांमुळे अनेक पालकांनी १७ मार्चनंतर मुदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार २५ मार्च रात्री बारापर्यंत आरटीईचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी पत्राद्वारे दिली. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्यावतीने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म मोफत भरण्याची सोय करून दिली आहे. जिल्ह्यातील समतादूत प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांचे फॉर्म विनामूल्य भरत आहेत. १७ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समतादुतांनी ७० ऑनलाईन फॉर्म विनामूल्य भरले. जिल्ह्यातील ४९ शाळांमध्ये २८७ आरटीई प्रवेशाच्या जागा आहेत. ज्या पालकांना आरटीई प्रवेशाचे फॉर्म विनामूल्य भरायचे आहेत, त्यांनी तालुक्यातील समतादूतांशी संपर्क साधावा, असे कळविले आहे.