विकासाच्या गोष्टी सांगण्यासाठीच सभा

विकासाच्या गोष्टी सांगण्यासाठीच सभा

rat18p26.jpg
89929
खेडः पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत. शेजारी आमदार योगेश कदम, शशिकांत चव्हाण.
-----------------
विकासाच्या गोष्टी सांगण्यासाठीच सभा
मंत्री उदय सामंत ; ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही
खेड, ता. १८ः शिवसेना आमदारांना बदनाम करणाऱ्यांना उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही विकासाच्या गोष्टी सांगण्यासाठी सभा घेत आहोत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत दिली. भरणेनाका येथील बिसू हॉटेलमध्ये शनिवारी (ता. 18) पालकमंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या वेळी त्यांच्यासोबत आमदार योगेश कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, अरुण कदम आदी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, यापूर्वी झालेल्या एका सभेमध्ये ज्यांनी शिवीगाळ केली त्यांना उत्तर देण्यासाठी ही सभा आम्ही घेत नसून महाराष्ट्रातील व कोकणातील जनतेला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी घेतलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णय यांची माहिती जनतेला व्हावी यासाठी ही सभा आहे. ४० आमदारांना बदनाम करण्यासाठी काहीजणांनी सभा घेण्याचे काम केले. त्यांना उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नाही. महाराष्ट्रातील महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. घरात बसून रात्री साडेनऊ वाजता ऑनलाईन येणाऱ्या नेत्यांना असे निर्णय घेता आले नाही. काही लोकांना इतरांची बदनामी करण्याव्यतिरिक्त कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना कोकणच्या विकासात्मक दिशेबाबत माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत.
आमदार योगेश कदम यांनी या मतदार संघात करोडो रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून, ज्यांनी यापूर्वी शिवसेनेच्या कोट्यातून दिलेले पैसे राष्ट्रवादीला देण्याचे काम केले त्यांना योगेश कदम यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. राज्य सरकार भाजप व शिवसेना एकत्र मिळवून चालवत असून भविष्यातील सर्व निवडणुका युती म्हणूनच लढवल्या जातील. भाजप व शिवसेनेचे नेते सर्व लोकांच्या जागावाटपाचा निर्णय एकत्र बसून घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये सभा होणार आहे. या सभेतच आमदार कदम यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल. ही सभा शिवसैनिक विक्रमी करणार आहेत, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
---------
चौकट
शिवसैनिकच देतील सभेतून उत्तर ः आमदार कदम
दापोली विधानसभा मतदार संघात २०१९ मध्ये शिवसैनिकांनी विरोधकांना गाडून त्यांच्या छाताडावर भगवा फडकवला आहे. त्यामुळे विरोधक कितीही म्हणत असले तरीही दापोली विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि उद्याच्या सभेमध्ये या मतदार संघातील ९० टक्के शिवसैनिक स्वतः उपस्थित राहून यावर शिक्कामोर्तब करतील व ५ मार्चला झालेल्या सभेत बाहेरून माणसे आणून वल्गना करणाऱ्यांना आपल्या उपस्थितीतून शिवसैनिक उत्तर देतील, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com