आंब्रड-कुंदे रस्त्यासाठी चार कोटी

आंब्रड-कुंदे रस्त्यासाठी चार कोटी

90016
आंब्रड ः येथील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचा सत्कार केला. यावेळी विकास राऊळ, दिनकर परब, मानसी कदम, विठ्ठल तेली, प्रवीण भोगटे, संदीप परब, विजय परब आदी.

आंब्रड-कुंदे रस्त्यासाठी चार कोटी

स्थानिक समाधानी; आमदार नाईकांचे मानले आभार

कणकवली,ता.१९ ः आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत आंब्रड परबवाडी नाटेकरवाडी ते कुंदे कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी ४ कोटी ३९ लाख रुपये निधी मंजूर झाला. आंब्रड आणि कुंदेवासीयांची गरज ओळखून आमदार नाईक यांनी हा रस्ता मंजूर केल्याबद्दल आंब्रडवासीयांतर्फे त्यांचा नुकताच जाहीर सत्कार केला.
आंब्रड-कुंदे मुख्य रस्ता ते आंब्रड रतांबेवाडी चंद्रकांत गावडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आमदार नाईक यांनी आमदार फंडातून ५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याचे भूमीपूजन सरपंच मानसी कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री. नाईक यांनी आंब्रड सरमळेवाडी येथील तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत लवकरच ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी यांची बैठक लावणार असल्याचे सांगितले. तसेच गावच्या विकासासाठी आवश्यक तो निधी पुरविला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शिवसेना विभागप्रमुख विकास राऊळ, विभाग संघटक दिनकर परब, सरपंच मानसी कदम, उपसरपंच विठ्ठल तेली, माजी पं.स.सदस्य प्रवीण भोगटे, माजी सरपंच संदीप परब, माजी उपसरपंच विजय परब, आनंद परब, माजी जि.प.सदस्या कल्पीता मुंज, ग्रामपंचायत सदस्य सागर वाळके, सेजल परब, तात्या आंगणे, शाखा प्रमुख रमेश परब, बबन परब, अशोक मसुरकर, सीताराम नाटेकर, दयानंद तावडे, अनिल परब आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com