लेखन कलेला तळेरेत प्रोत्साहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेखन कलेला तळेरेत प्रोत्साहन
लेखन कलेला तळेरेत प्रोत्साहन

लेखन कलेला तळेरेत प्रोत्साहन

sakal_logo
By

90072
संचिता पाटील, अनुश्री राणे, अक्षता गुंजाळ


लेखनकलेला तळेरेत प्रोत्साहन

हस्ताक्षर स्पर्धेत ४०९ जणांचा सहभाग; ‘अक्षरोत्सव परिवार’चा जिल्हास्तर उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १९ : तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फ़ूर्त प्रतिसाद मिळाला. तिन्ही गटांत मिळून एकूण ४०९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत विविध गटांत संचिता पाटील, अनुश्री राणे व अक्षता गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
शालेय मुलांना लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि मानवाला उपजत मिळालेली लेखनशैली भविष्यात कार्यरत राहावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दोन वर्षे यशस्वी आयोजनानंतर यंदा तिसऱ्या वर्षीही या स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फ़ूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी व नववी ते बारावी अशा तीन गटांत घेण्यात आली. या प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तसेच उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे परीक्षण सुलेखनकार अभिजित राणे, युवराज पचकर यांनी केले. यावर्षी सुप्रसिध्द कवी प्रदीप पाटील यांच्या सामाजिक आशयावरील कविता लेखनासाठी देण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचा गटनिहाय अनुक्रमे निकाल असा ः गट पहिला (पहिली ते चौथी) : संचिता पाटील (प्राथमिक शाळा ओटव-ओटववाडी), शिवन्या पचकर (विद्यामंदिर लोरे-मोगरवाडी), रिया आग्रे (विद्यामंदिर लोरे-मोगरवाडी), स्वरा ओतारी (श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्रशाळा, साटेली भेडशी), दीपेश विटेकर (शाळा वजराट देवसू, ता. वेंगुर्ले), सुकन्या नराम (विद्यामंदिर लोरे-मोगरवाडी). गट दुसरा (पाचवी ते आठवी)-अनुश्री राणे (एस. एम. हायस्कूल कणकवली), रुद्र शेटे (विद्यामंदिर गडमठ नं. १), लक्ष्मण सावंत (माऊली विद्यामंदिर डोंगरपाल, सावंतवाडी), समर्थ शिरसाट (शिवडाव माध्यमिक), संकेत गावकर (शिवडाव माध्यमिक विद्यालय), श्रेया कदम (एस. एम. हायस्कूल कणकवली).
गट तिसरा (नववी ते बारावी)-अक्षता गुंजाळ (कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज), तनया कदम (एस. एम. हायस्कूल कणकवली), प्रभाती देवळी (राजमाता सत्वशिलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी), रुतुजा परब (शिवडाव माध्यमिक विद्यालय), वैष्णवी कुणकेरकर (एम. एम. सावंत ज्युनियर कॉलेज, कनेडी), ओंकार सदडेकर (शिवडाव माध्यमिक विद्यालय).
---
तळेरेत होणार बक्षीस वितरण
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तळेरे येथे होणार असून त्याबाबत विजेत्या स्पर्धकांना कळविण्यात येईल. त्यावेळी विजेते स्पर्धक आणि निवडक स्पर्धकांच्या हस्ताक्षरातील कवितांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. गतवर्षी ज्या विजेत्यांनी आपली पारितोषिके नेली नाहीत, त्यांनाही पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहेत. सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन अक्षरोत्सव परिवाराचे प्रमुख निकेत पावसकर, श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन्सचे संचालक सतीश मदभावे, श्रावणी मदभावे यांनी केले.