समाजवादी नेते एलिअस डान्टसांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजवादी नेते एलिअस डान्टसांचा सत्कार
समाजवादी नेते एलिअस डान्टसांचा सत्कार

समाजवादी नेते एलिअस डान्टसांचा सत्कार

sakal_logo
By

९००६९


समाजवादी नेते डान्टस यांचा सत्कार

कट्टा सेवांगणचा पुढाकार; प्रा. दंडवते जन्मशताब्दीनिमित्त उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः वराड (ता. मालवण) गावचे सुपुत्र व ज्येष्ठ समाजवादी नेते एलिअस डान्टस यांचा ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा सत्कार केला.
कट्टा पंचक्रोशीतील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून डान्टस यांची ओळख आहे. गेली सुमारे ७५ वर्षे कट्टा-वराडचे रेशन दुकान डान्टस कुटुंबीयांकडे आहे. डान्टस यांचे वडील घाब्रीयल डान्टस यांनी प्रतिकुल परिस्थितीत अत्यंत प्रामाणिकपणे हे दुकान सांभाळले. एक प्रामाणिक माणूस, दानशूर, गरिबांचा सहाय्यक अशी त्यांची कट्टा दशक्रोशीत ख्याती होती. त्या काळात बहुसंख्य लोक रेशनवर अवलंबून असताना आपल्या प्रामाणिक कामातून त्यांनी एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण केली होती. त्यांचा वारसा चालविताना एलिअस हे सुमारे ६० वर्षांपेक्षा जास्त काळ रेशन दुकान चालवत आहेत. जबाबदारीने व प्रामाणिकपणे त्यांनी हे दुकान सांभाळले. मालवण तालुक्यात त्यांचे रेशन दुकान आदर्श मानले जाते. ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकते होते; परंतु ज्येष्ठ समाजवादी विचारवंत बापूभाई शिरोडकर यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गडकरीवाडीचे मतदान केंद्र ते सांभाळायचे. पुढे प्रा. मधू दंडवते यांच्या विचाराने प्रभावित होऊन ते दंडवतेप्रेमी बनले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम केले. त्यांच्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित झाली. मालवण तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचारी त्यांचा सन्मान करतात. त्यांच्या जातशत्रू, दिलदार, मनमिळावू, मितभाषी, प्रामाणिक व्यक्तिमत्वाचा बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व बॅ. नाथ पै चे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, शाम पावसकर, दीपक भोगटे, लक्ष्मण भिसे, राजीव म्हाडगुत, सुजाता पावसकर, मनोज काळसेकर, बाळकृष्ण गोंधळी उपस्थित होते.