
ग्राहक अधिकारांबाबत पथनाट्यामधून जागृती
90071
कुडाळ ः व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजने ‘जागो ग्राहक जागो’ पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली. (छायाचित्र ः अजय सावंत)
ग्राहक अधिकारांबाबत
पथनाट्यामधून जागृती
कुडाळमधील उपक्रमाला प्रतिसाद
कुडाळ, ता. १९ ः जागतिक ग्राहक अधिकार दिनानिमित्त येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजने ''जागो ग्राहक जागो'' या पथनाट्याच्या माध्यमातून येथील तालुका न्यायालयात जनजागृती केली.
ग्राहकांना त्यांचे अधिकार कर्तव्य यांची माहिती मिळावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग आणि व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज यांनी हा उपक्रम राबविला. पथनाट्याच्या ग्राहकांचे अधिकार सोप्या शब्दांत लोकांसमोर मांडण्यात आले. कोणत्याही वस्तूची खरेदी करताना एक ग्राहक म्हणून किती सजग असावे, हे पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे मांडले. या कार्यक्रमासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश आश्विनी बाचूलकर, सहप्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ढोरे उपस्थित होते. बाचूलकर आणि ढोरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत ग्राहकांचे अधिकार उपस्थित पक्षकारांना सांगितले. लॉ कॉलेजच्या प्रा. वेदिका नाखरे यांनी उपस्थितांना जागतिक ग्राहक अधिकार दिनाची माहिती सांगून ग्राहक अधिकाराची सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पथनाट्यात चैतन्या सावंत, प्रथमेश सामंत, सुधा दामले, अपर्णा भिऊंगडे, पूजा गोड़कर, काजल पेडणेकर यांनी अभिनय कौशल्यातून जनजागृती केली. संदेश कोरगावकर याने साथसंगत केली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, न्यायालयातील वकील वर्ग, पक्षकार आदी उपस्थित होते.