
वाफोली येथील शिबिरात १८० महिलांची चिकित्सा
90659
वाफोली ः येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना प्रमोद कामत. शेजारी इतर.
वाफोली येथील शिबिरात
१८० महिलांची चिकित्सा
बांदा, ता. २२ ः वाफोली ग्रामपंचायत व घे भरारी ग्रामसंघाच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वाफोली येथील सोसायटी सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. शिबिरामध्ये महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सीबीसी, थायरॉईड, कॅल्शियम, रक्तातील काविळीची तपासणी व त्यावरील उपचारासाठी मोफत औषधे वाटप करण्यात आले. सरपंच उमेश शिरोडकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नेत्रा सावंत, विलवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. पुष्पलता मणेरीकर-सावळ आदी उपस्थित होते. शिबिरासाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. डॉ. सावंत यांनी स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या विविध रोगांचे व उपचार पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. गावातील तब्बल १८० महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. वाफोली विकास सोसायटीच्या चेअरमन धनश्री गवस यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच विनेश गवस यांनी आभार मानले.