पोलिस भरतीसाठी 
२६ ला लेखी परीक्षा

पोलिस भरतीसाठी २६ ला लेखी परीक्षा

पोलिस भरतीसाठी
२६ ला लेखी परीक्षा

२५३ जण पात्र; कुडाळ येथे केंद्र


ओरोस, ता. २२ ः सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस भरती २०२१ मधील पोलिस शिपाई चालक पदाच्या २२ पदांसाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २५३ उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (ता. २६) सकाळी साडेआठला कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेज या केंद्रावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात रिक्त असलेल्या १२१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये २२ चालक आणि ९९ कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती होत आहे. चालक पदाच्या २२ पदांसाठी २ हजार १३६, तर ९९ कॉन्स्टेबल पदासाठी ५ हजार ९५८ अर्ज आले होते. चालक पदासाठी २ ते ४ जानेवारी या कालावधीत, तर कॉन्स्टेबल पदासाठी ५ ते ११ जानेवारी या कालावधीत मैदानी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर चालक पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी परीक्षेत रिक्त जागांच्या एकास दहा याप्रमाणे समांतर आरक्षणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. तर मागाहून कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. याबाबतची यादी आज www.sindhudurgpolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवाराचे नाव, अर्ज नंबर व चेस्ट नंबर यांसह प्रसिद्ध केली आहे. यातील चालक पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २५३ उमेदवारांची लेखी परीक्षा २६ ला जाहीर केली आहे. ही परीक्षा कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेज येथे सकाळी ८.४० ला सुरू होणार आहेत. या परीक्षेचे प्रवेशपत्र हे ‘महाआयटी’ मार्फत ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करण्यास उपलब्ध आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी दोन तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. उमेदवारांनी पोलिस नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com