Wed, May 31, 2023

सावंतवाडीत आज ‘आझाद हिंदची गाथा’
सावंतवाडीत आज ‘आझाद हिंदची गाथा’
Published on : 22 March 2023, 12:17 pm
सावंतवाडीत आज ‘आझाद हिंदची गाथा’
सावंतवाडी ः श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे विद्यार्थी ‘आझाद हिंदची गाथा’ हे नाटक सादर करणार आहेत. उद्या (ता. २३) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांत एकाच दिवशी ७५ महाविद्यालये ७५ ठिकाणी ७५ प्रयोग सादर करणार आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी आणि ‘आर्टिस्टिक ह्युमन’च्या (Artistics Human) सहकार्याने हे प्रयोग सादर करणार आहेत. प्रशालेच्या हॉलमध्ये सकाळी अकराला हा प्रयोग होईल.