श्रीरामनवमी महोत्सवास कुडाळेश्वर मंदिरात प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीरामनवमी महोत्सवास 
कुडाळेश्वर मंदिरात प्रारंभ
श्रीरामनवमी महोत्सवास कुडाळेश्वर मंदिरात प्रारंभ

श्रीरामनवमी महोत्सवास कुडाळेश्वर मंदिरात प्रारंभ

sakal_logo
By

swt२३२२.jpg मध्ये फोटो आहे.

कुडाळ ः श्री देव कुडाळेश्वर महाराजांची जोतिबाच्या रुपातील पूजा.

श्रीरामनवमी महोत्सवास
कुडाळेश्वर मंदिरात प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे श्रीरामनवमी महोत्सवास कालपासून (ता. २२) प्रारंभ झाला. या महोत्सवात कीर्तन श्रवणासाठी भक्तांच्या दरबारात श्री देव कुडाळेश्वर महाराज सिंहासनाधिष्ठीत होतात. हा सोहळा पाहण्यासाठी व महाराजांसोबत कीर्तन श्रवण करण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी काल सकाळी पाषाणमूर्तीवर लघुरुद्र अभिषेक, दुपारी गुढीरोहण, पूजन, नववर्ष फलवाचन, श्रींची महापूजा, सायंकाळी वालावलकर दशावतारी नाटक मंडळींचे पौराणिक नाटक ''बालभुवनेश्वर'', आरती, रात्री मंत्रघोष, पुराण वाचन, श्रींची पालखी मिरवणूक झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण, गायक, वादक उपस्थित होते. रात्री सभागृहात कीर्तन श्रवणासाठी श्रींच्या उत्सव मूर्तींचे आगमन झाले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर कीर्तन व आरती झाली. उद्या (ता. २४) सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण, श्री देव कुडाळेश्वर महिला मंडळ आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विनोदी नाटिका ‘श्रीवल्ली’ असे कार्यक्रम होणार आहेत. सोहळ्याच्या ११ दिवसांच्या कालावधीत दररोज श्री देव कुडाळेश्वर महाराजांची विविध रुपांत पूजा साकारण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी महाराजांची जोतिबाच्या रुपात पूजा साकारण्यात आली. हा महोत्सव १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाने केले आहे.