गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी एकास 29 पर्यंत कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी एकास 29 पर्यंत कोठडी
गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी एकास 29 पर्यंत कोठडी

गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी एकास 29 पर्यंत कोठडी

sakal_logo
By

गावठी बॉम्ब प्रकरणी एकाला कोठडी

खेड, ता. २५ ः तालुक्यातील भरणे गावातील समर्थनगर येथील एका घरातून तब्बल ८० हून अधिक गावठी बॉम्ब ताब्यात घेऊन स्फोटके बाळगल्याप्रकरणी एकास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तालुक्यातील भरणे समर्थनगर येथील घरामध्ये ज्वालाग्राही असे बॉम्ब घरात ठेवणे व बाळगणे हे धोकादायक आहे, हे माहिती असूनही संशयित अल्पेश जाधव याने ते गावठी बॉम्ब आपल्या घरात ठेवून ते बाळगल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी संशयितास खेड येथील न्यायालयात हजर केले असता २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अद्यापही तपास सुरू असून, आणखी काही संशयितांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.