
देवगड पोलिसांचा नागरिकांशी संवाद
91685
देवगड पोलिसांचा नागरिकांशी संवाद
देवगड : येथील पोलिस ठाणे आणि येथील विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने महिला, नागरिक, पोलिस पाटील तसेच ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यांना पोलिस ठाणे स्तरावर चाललेल्या कामकाजाबाबत तसेच विधी सेवा प्राधिकरण, लोक न्यायालय याबाबत माहिती देण्यात आली. येथील पोलिस ठाण्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. माळी, पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, उपनिरीक्षक दशरथ चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी श्री. माळी यांच्यासह श्री. बगळे यांनी मार्गदर्शन केले. मार्चमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस पाटीलांचा या दरम्यान सत्कार करण्यात आला.
....................
मालवणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
मालवणः सिंधुदुर्गातील सर्वात मोठी स्पर्धा अशी ओळख असलेली बाबा परब मित्रमंडळ आयोजित नीलेश राणे चषक डे-नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या ‘नीलेश राणे चषका’चे अनावरण चिवला बीच येथे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा १९ ते २२ एप्रिल या कालावधीत येथील बोर्डिंग ग्राउंड येथे आयोजित केली आहे. यावेळी आयोजक तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, मालवण असोशिएशनचे सेक्रेटरी नंदू देसाई, पप्पू परब, राजू वडवलकर, सहदेव बापर्डेकर, विजय चव्हाण, सौरभ ताम्हणकर, जॉनी ब्रिटो, लुईस फर्नांडिस आदी उपस्थित होते.