
रत्नागिरी- आंबेशेतच्या महिलांचे पालखी नृत्य लक्ष्यवेधी
rat२७१९.txt
बातमी क्र. १९ (टुडे पान ३ साठी, अॅंकर)
फोटो ओळी
-rat२७p१२.jpg-
91678
रत्नागिरी ः पालखी नाचवताना आंबेशेत वायंगणकरवाडी येथील श्री साईसेवा महिला मंडळाच्या सदस्य. दुसऱ्या छायाचित्रात मंडळातील महिला व ढोल-ताशा वादक कलाकार.
--------------
आंबेशेतच्या महिलांचे पालखी नृत्य लक्ष्यवेधी
साई सेवा महिला मंडळ; नाचविण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली
रत्नागिरी, ता. २७ ः शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी नाचविण्याची रंगत काही औरच असते. बहुसंख्य ठिकाणी पुरुषच पालखी खेळवतात, नाचवतात; परंतु आंबेशेत वायंगणकरवाडीतील श्री साई सेवा महिला मंडळातील महिलांनी पालखी नृत्य साकारले. हे मंडळ पालखी नाचविण्याचे ठिकठिकाणी कार्यक्रम करत असून, त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पुरुषांप्रमाणेच महिला पालखी नाचवतात. हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो प्रेक्षक जमतात आणि महिला मंडळाचे कौतुक करतात.
मंडळाच्या महिलांनी गेल्या वर्षीच पालखी नाचविण्यास सुरुवात केली आहे. महिलांना नृत्याचे अंग असतेच. त्यामुळे पालखी नाचविण्याकरिता त्या वेगवेगळ्या स्टेप्स वापरत असल्याने ते बघायला चांगले वाटते. थोडी वेगात, वेगळ्या ढंगात, खांदा, मनगट, डोक्यावर पालखी घेऊन नाचवितात. नृत्याच्या विविध स्टेप्स बसविल्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण पालखी नाचविण्यामुळे प्रेक्षकांनाही खूप आनंद वाटतो. विशेष म्हणजे प्रेक्षक महिलांना आश्चर्य वाटते.
रत्नागिरी ग्राहकपेठेत श्री साई सेवा महिला मंडळाचा रविवारी (ता.२६) कार्यक्रम रंगला. मंडळाने पहिले सादरीकरण २०२२ मध्ये रामनवमीच्या दिवशी आंबेशेत येथे केले आणि इथूनच समाजमाध्यमांतून मंडळाचा प्रसिद्धी मिळत गेली. यामुळे महिला अधिकच प्रेरित होऊन नियमित कामकाजातून थोडा वेळ या कलेसाठी देऊ लागल्या. ही अनोखी कला सादर करण्यापूर्वी महिला अनेक कलाविष्कार सादर करायच्या. त्यावेळेपासून कुटुंबीयांकडून चांगले सहकार्य मिळत गेले आणि सध्या विविध ठिकाणी जाऊन निमंत्रणानुसार किंवा स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत.
श्री साई सेवा महिला मंडळाने यापूर्वी गावखडी, चिपळूण, देवरूख, गुहागर, पाली अशा विविध ठिकाणी पालखी नृत्याचा कलाविष्कार सादर केलेला आहे. याचे श्रेय मिलिंद वायंगणकर यांना जाते. कारण, त्यांच्या संकल्पनेतूनच हे पालखी नृत्य महिला सादर करीत आहेत. त्याचप्रमाणे इतर गावांतील सर्व महिला मंडळ आणि पुरुषांचेही मोलाचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे. ग्रुपमधील सर्व महिला दैनंदिन कामकाज आटोपून दररोज रात्री या कलेच्या सरावासाठी नियमित थोडा वेळ काढतात.
-----------
चौकट १
पालखी नृत्यात सहभागी महिला
श्रुती वायंगणकर, शाल्वी वायंगणकर, शिवानी वायंगणकर, श्रद्धा वायंगणकर, समीक्षा वालम, संजीवनी घाणेकर, गिरिजा नाईक, सर्वता चव्हाण, सुगंधा भारती, शीतल सकपाळ, पूर्वा मयेकर, आकांक्षा वायंगणकर.
........................