मोबाईलचा वापर काळजीपूर्वक करा

मोबाईलचा वापर काळजीपूर्वक करा
Published on

91704
मडुरा ः येथे विद्यार्थ्यांसमवेत अॅड. विवेक टोपले, मंगल कामत, समीर भोसले, राय शिरोडकर, मुख्याध्यापक वराडकर, जे. डी. सावंत आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

मोबाईलचा वापर काळजीपूर्वक करा

अॅड. विवेक टोपले; मडुरा हायस्कूलमध्ये मार्गदर्शन शिबिर

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः मोबाईलमुळे मनोरंजन होत असले तरी मोबाईल हा आपल्याला समाज, कुटुंब, मित्रपरिवारापासून वेगळे करत आहे आणि हा सर्वांत मोठा धोका आहे. मोबाईलचा वापर जीवनात कशा पद्धतीने करावा, हे लक्षात घेत त्यावरील दुष्परिणामांवर मात करून त्याचा सदुपयोग कसा करावा, याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मोबाईल हे मृगजळ असून यातील अपूर्ण ज्ञान धोकादायक ठरू शकते. त्यामुळे परिपूर्ण ज्ञानाबरोबरच सुरक्षाही बाळगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीतील अॅड. विवेक टोपले यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा हायस्कूलच्या सांस्कृतिक सभागृहात कामत चॅरिटेबल ट्रस्ट दिशा फाउंडेशन, कासतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मोबाईल वापर व सायबर गुन्हे’ विषयी मार्गदर्शन शिबिरात अॅड. टोपले बोलत होते. व्यासपीठावर दिशा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मंगल कामत, बांदा पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले, मुख्याध्यापक वराडकर, बांदा पोलिस कर्मचारी राय शिरोडकर आदी उपस्थित होते.
अॅड. टोपले म्हणाले, ‘‘मोबाईल सतत हातात ठेवल्यास आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. अल्पवयीन मुले मोबाईलमुळे चुकीच्या मार्गाला जातात. ऑनलाईन शिक्षण घेताना मुले मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करतात, यावर पालकांचीही देखरेख असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासापुरताच मोबाईल काळजीपूर्वक वापरून समाजात चांगले चित्र निर्माण करणे गरजेचे आहे.’’
पोलिस कर्मचारी राय शिरोडकर म्हणाले की, ‘‘ग्रामीण भागातील बहुतांश मुले शेतकरी कुटुंबातीलच असतात. त्यामुळे शेतकरी काबाडकष्ट करतात व तुमच्यासाठी मोबाईल देतात; मात्र ९० टक्के मुले रात्रीच्यावेळी इंटरनेटवर असतात. मोबाईल काळजीपूर्वक वापरल्यास चुकीच्या दिशेने पाऊल पडणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीचे चुकीच्या दिशेने पाऊल पडल्यास ग्रामीण भागातील सीसीटीव्ही जलद गतीने ते पोलिसांपर्यंत पोहोचतात.’’ मंगल कामत यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका जे. डी. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक वराडकर यांनी आभार मानले.
-
वाचन वाढवा, मैदानी खेळ खेळा
उपनिरीक्षक समीर भोसले म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करत मैदानी खेळ वाढवावेत. पुस्तक वाचन करावे. कुटुंबातील सदस्यांचे फोटो व्हाट्सॲप डीपी, फेसबुक, इंस्टाग्रामवर ठेवू नये. याचे अनेक दुष्परिणाम होऊन त्याचे गुन्ह्यात रुपांतर होते. यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांत सहभाग घ्यावा. शिक्षकांना विचारून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने मोबाईलचा वापर करा. मोबाईल जेवढी सोपी गोष्ट आहे, तेवढीच धोकादायक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com