सिंधुदुर्गनगरीत आज पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गनगरीत आज पुरस्कार वितरण
सिंधुदुर्गनगरीत आज पुरस्कार वितरण

सिंधुदुर्गनगरीत आज पुरस्कार वितरण

sakal_logo
By

सिंधुदुर्गनगरीत आज पुरस्कार वितरण
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम उद्या (ता.२८) सकाळी अकराला जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था सभागृह येथे आयोजित केला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील ८ शिक्षकांची ५ सप्टेंबर २०२२ ला (शिक्षक दिनी) पुरस्कारासाठी निवड केली होती. या निवड झालेल्या शिक्षकांना सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये श्रीमती आदिती राणे पदवीधर शिक्षक (देवगड), डॉ. उत्तम तानावडे उपशिक्षक (दोडामार्ग,) सत्यवान चव्हाण पदवीधर शिक्षक (कणकवली), विजय धामापूरकर पदवीधर शिक्षक (कुडाळ ), गुरुनाथ ताम्हणकर उपशिक्षक (मालवण), केशव जाधव पदवीधर शिक्षक (सावंतवाडी), श्रीमती राजश्री शेटे (पदवीधर शिक्षक,वैभववाडी), विनोद मेथर, उपशिक्षक (वेंगुर्ले) आदी शिक्षकांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.
---------
सावंतवाडीत ३० पासून ‘रामकथा’
सावंतवाडी ः येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्यावतीने श्रीराम नवमी उत्सवानिमित्त ‘रामकथा’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम भटवाडी येथील हरेकृष्ण संस्कार केंद्रात ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान होणार आहे. रामभक्तांनी आणि हिंदू बांधवांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.