Fri, June 9, 2023

-रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
-रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
Published on : 27 March 2023, 2:37 am
रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
चिपळूण, ता. २७ ः तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. समीर आत्माराम सावरटकर (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. सावरटकर हे सोमवारी (ता. २७) सकाळी पेढे येथील आपल्या बहिणीकडे गेले होते. बहिणीला भेटल्यानंतर तो चालत रेल्वे रूळ ओलांडत असता रेल्वेची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. फरशी तिठ्याजवळ हा अपघात घडला. पोलिसांनी हा मृतदेह विच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात पाठविण्यात आला असून पिंपळी येथील गजमल पिंपळीमधील नातेवाईकांना ही माहिती कळविण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.