-रमजानच्या निमित्ताने 10 प्रकारचे खजूर बाजारात

-रमजानच्या निमित्ताने 10 प्रकारचे खजूर बाजारात

रमजान महिन्यात बाजारात 10 प्रकारचे खजूर

गतवर्षीपेक्षा किंमतीत घट ; स्पेशल अरेबियन खजूरही उपलब्ध ; आखाती देशातून आयात

चिपळूण, ता. ३० ः मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे. शहरातील विविध बाजारपेठा सजू लागल्या आहेत. रमजानचा उपवास खजूर खाऊन सोडण्याची परंपरा आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारात 10 पेक्षा जास्त प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत.
बाजारात लाल आणि काळे खजूर उपलब्ध असून, लाल खजूर साधारणतः 70 ते 100 रु. प्रतिकिलो तर काळे खजूर सौदी 140 ते 600 रु. प्रतिकिलो आहेत. स्पेशल खजूर अरेबियन 600 ते 1200 रु. प्रतिकिलो बाजारात उपलब्ध आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खजुराच्या किमती 5 ते 10 टक्क्यांनी घटल्याची माहिती विक्रेते सदाकत पेचकर यांनी दिली. सामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत खजूर खरेदी करू शकतील अशा सगळ्या प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध आहेत. काळ्या खजुरामध्ये विविध प्रकारच्या पॅकिंगला सर्वाधिक मागणी आहे. अजवा आणि मगजोल खजुराला जास्त मागणी आहे. काळे खजूर ही आखाती देशांतून आयात केले जाते.
-
कोट
बाजारात अजवा, मगजोल, बुमेन, फर्द, किमिया, फरत, सुलतान, बुरारी, कलमी, मदिना, रूक्सार, हसना, हार्मोनिअम, मुज्जरब, गुड, अल्जेरियन यांसह 10 पेक्षा जास्त खजूरचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यावर्षी रजान हा खजुराचा नवीन प्रकार बाजारातून आला आहे. तो वजनाने हलका आणि 3 इंच लांब आहे. बाजारात रजान खजुराला मोठी मागणी आहे.
- सदाकत पेचकर, खजूर विक्रेते
-
या देशातून आयात होतात खजूर
इराण, इराक, सौदी, दुबई, ओमन, मस्कत या आखाती देशातून खजूर भारतात आयात केले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com