सावर्डे-सोनवी, बावनदी पुलांची कामे जैसे थे

सावर्डे-सोनवी, बावनदी पुलांची कामे जैसे थे

at29p21.jpg
92238
संगमेश्वरः नावडी येथे नव्या पुलाचे काम अर्धवटच आहे.
-
सोनवी, बावनदी पुलांची कामे जैसे थे
चौपदरीकरणाची स्थिती ; ठेकेदार नवा तरी काम थांबली
सावर्डे, ता.३०ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील विविध टप्प्यांची कामे सुरू असली तरीही सोनवी नदी आणि बावनदी या दोन पुलांच्या कामांना मुहूर्त मिळालेला नाही. ही कामे अपुर्णच आहेत. नवीन ठेकेदार नेमुनही कामं थांबल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. खेड येथील जगबुडी नदीवरील पुलावरून वाहतुक सुरू झाली. आरवली गडनदी, कसबा शास्त्री या पुलाची कामेही बहुतांशी पूर्ण झाली आहेत; तेथील पूल आणि रस्ता जोडण्यासाठीचा भराव टाकण्याचे काम शिल्लक आहे. जोपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण होत नाही, तोपर्यंत जोडरस्त्यांची कामे होणार नाहीत. मात्र संगमेश्वरमधील सोनवी आणि बावनदी या दोन पुलांची कामे पुर्वीपासूनच रखडलेली आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून कामाला सुरवात झाली. थोडे काम करण्यात आले, पण त्यात अडथळे निमोण होत गेले. या पुलांच्या कामांना वेग यावा यासाठी केंद्र शासनाकडून कडक पावले उचलली होती. जून्या ठेकेदाराकडून काम काढून नवीन ठेकेदार नियुक्त केला गेला. बावनदी पुलाचे कामही सुरू केले होते. ते अधुनमधून सुरू केले जाते. सातत्य नसल्यामुळे सोनवी आणि बावनदी पूल उभारणे हे मोठे आव्हानच आहे. रस्त्यांचे काम सुरू होण्यापूर्वी कोकणातील पुलांच्या कामांचे भूमिपूजन झाले होते. महामार्ग चौपदरीकरणात रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण मे अखेरीस पूर्ण होईल, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. रस्ते पूर्ण झाले तरीही या दोन जुन्याच पुलावरुन वाहतूक सुरू ठेवावी लागणार आहे.

कोट
संगमेश्वर सोनवी पुलाचे केवळ खोदकाम करून पुढे काम बंद आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास पुढील वर्षाशिवाय ते सुरू करता येणार नाही. संगमेश्वर बाजारपेठत पाणी भरत असल्याने काम उन्हाळ्यात पूर्ण करणे आवश्यक आहे.
- विवेक शेरे, सरपंच, नावडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com