सावधान...! कोरोना वाढतोय

सावधान...! कोरोना वाढतोय

rat२९२९.txt

बातमी क्र. . २९ (पान ३ साठीमेन)

सावधान...! कोरोना वाढतोय

जिल्हाधिकारी देवेंदर सिंह; दोन दिवसांत २४ बाधित, जिल्हा टास्कफोर्सच्या बैठकीत सूचना

रत्नागिरी, ता. २९ ः राज्यात व देशात कोरोनाची रुग्णसंख्या फेब्रुवारी २०२३ पासून वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कोविड रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्तरांवर सतर्कता बाळगणे आणि पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा टास्कफोर्स सभा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. दोन दिवसात २४ बाधित सापडले आहेत.
मंगळवारी (ता. २८) झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा टास्कफोर्स सभेमध्ये राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते.
राज्यासह देशभरात कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या एक्सबीबी १.१६ व्हेरिएंटचा संसर्ग पसरला तर चिंता वाढवू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आधीच्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव तीन ते चार दिवसांतील उपचाराने कमी होत असे; परंतु या संसर्गाचा प्रादुर्भाव सात ते आठ दिवसांपर्यंत राहतो. त्यामुळे गाफील राहू नका, आतापासूनच काळजी घ्या, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या तीन वर्षांच्या अनुभवावरून यंदाच्या उन्हाळ्यात कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले असल्याने रुग्णवाढीचा आलेख पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत कमी राहील, असा आरोग्यतज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, इतर आजार असलेल्यांसाठी नवा व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
.......................
चौकट....
जिल्ह्यात २४ कोरोनाबाधित
रत्नागिरीत एकूण २१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील मंडणगड १, चिपळूण ७, संगमेश्वर ५, रत्नागिरी ५, लांजा १ व राजापूर २ असे आहेत. यापैकी ४ रुग्णालयात दाखल आहेत, तर १७ रुग्ण गृहविलगीकरणामध्ये आहेत. आज नवीन ३ रुग्ण सापडले आहेत.
-----------
चौकट...
...अशा आहेत मार्गदर्शक सूचना
मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, साबण व पाण्याने वारंवार हात धुणे, लक्षणे जाणवल्यास तपासणी करून घेणे, ऑक्सिजन लेवल तपासणे, श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्यास अॅडमिट होणे, गर्दीच्या ठिकणी जाणे टाळावे आदी सूचना केल्या आहेत.
...............................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com