साखरपा, पोफळी, भरणेत सीसीटीव्ही

साखरपा, पोफळी, भरणेत सीसीटीव्ही

rat२९१५.txt

बातमी क्र. १५ (पान ३ साठी)

साखरपा, पोफळी, भरणेत सीसीटीव्ही

दीपक खाडे; अवैध लाकूड वाहतूक रोखण्यात वनविभागाने कसली कंबर

चिपळूण, ता. २९ ः ‘तालुक्यात सुरू असलेल्या विनापरवाना जंगलतोडीवरून वातावरण तापले आहे. लाकूडसाठ्याचे ढिगारे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय जिल्ह्यात सर्वत्र होत असलेल्या बेसुमार जंगलतोड आणि त्याची परजिल्ह्यांत होणारी अवैध लाकूड वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. यासाठी साखरपा, पोफळी आणि भरणे येथील तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत,’ अशी माहिती विभागीय वनअधिकारी दीपक खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तालुक्यातील दसपटी विभागात बेसुमार जंगलतोड होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर नांदिवसे आणि ओवळी येथील लाकूडसाठ्यावर कारवाईदेखील झाली. मात्र, विविध ठिकाणी छुप्या पद्धतीने होणाऱ्या विनापरवाना जंगलतोडीवर तितकीशी कारवाई झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून दसपटीतील जंगलतोडीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर वनविभागाकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. सध्या चिपळूण वनपरिमंडळात एक वनपाल आणि दोन वनरक्षक असून, त्यांच्याकडे ११० गावांची जबाबदारी आहे. तालुक्यात शासकीय जंगल कमी आणि खासगी मालकी क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यातच अवैध जंगलतोड आणि परराज्यात होणारी वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाचे पोफळी, साखरपा आणि भरणे येथे तपासणी नाके आहेत. आता या नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा सर्व्हर मुख्य कार्यालयात ठेवून त्या कार्यालयातून त्याचे नियंत्रण केले जाणार आहे. अवैध जंगलतोड आणि वाहतूक यासंदर्भात कुणाच्या तक्रारी असल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास कारवाई केली जाईल, असेही विभागीय वनअधिकारी खाडे यांनी स्पष्ट केले.
......................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com