डंपर वाहतुकीविरुध्द कोळंबवासीय आक्रमक

डंपर वाहतुकीविरुध्द कोळंबवासीय आक्रमक

swt३०३७.jpg
९२५३३
कोळंबः येथे संतप्त ग्रामस्थांनी डंपर रोखले.

डंपर वाहतुकीविरुध्द कोळंबवासीय आक्रमक
वाहतूक रोखलीः अपघातानंतर भरपाई देण्यास टाळाटाळ; गतिरोधकाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : आचरा-मालवण मार्गावरून भरधाव वेगाने येणारा वाळूचा डंपर कोळंब येथे दगडी कुंपण तोडून घराच्या अंगणात घुसल्याच्या घटनेनंतर कोळंब येथील वातावरण तणावाचे बनले. संबंधित डंपर मालकाने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने आज सकाळपासून ग्रामस्थांनी कोळंब मार्गावरील डंपर रोखले. भरधाव डंपरचा वेग कमी करण्यासाठी जोपर्यंत ओझर ते कोळंब रस्त्यावर गतिरोधक होत नाही, तोपर्यंत या मार्गावरून डंपर वाहतूक होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू होता. डंपर चालकाने ग्रामस्थांची माफी मागावी आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दुपारनंतर नुकसान भरपाईबाबत ग्रामस्थ व डंपर मालक यांच्यात तडजोड झाल्याने ग्रामस्थांनी अडविलेले डंपर सोडून देण्यात आले.
आचरा ते मालवण मार्गावरून भरधाव वेगाने वाळूची वाहतूक करणारे डंपर स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. आचऱ्याकडून मालवणच्या दिशेने येणाऱ्या डंपरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा डंपर (एमएच ०७ सी ६१३१) दगडी कुंपण तोडून थेट अंगणात घुसल्याची घटना काल (ता. २९) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोळंब येथे घडली. याठिकाणी दररोज मुले खेळत असतात. सुदैवानेच येथे कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक बनले. संबंधित डंपर चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भरधाव डंपरमुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे येथून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा वेग कमी न झाल्यास कोळंब मार्गावरून डंपर वाहतूक बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. आज सकाळपासून येथून वाळू नेणारे डंपर अडवण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली.
यावेळी कोळंब सरपंच सीया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, संदीप शेलटकर, पद्मा गवाणकर, आबा भोजने, शरद लोके, भास्कर कवटकर, सुनील फाटक, सचिन कांडरकर, हेमंत कामतेकर, आबू नेरकर, अवी नेरकर, पंकज कवटकर, हर्ष बांदेकर, रुपेश आंगणे, श्रीधर परुळेकर, मयुरेश मेस्त्री, प्रसाद कामतेकर, बापू बावकर, साहिल पराडकर, चिन्मय पराडकर, महेश शेलटकर, रोहित हडकर, शशांक धुरी, प्रमोद कांडरकर, राजू सालकर, राजेंद्र प्रभुगावकर, यश बांदेकर, महेश कांदळगावकर, महेश सातार्डेकर, संतोष धुरी, किशोर कांदळगावकर, सुशांत भोजने यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या ठिकाणी आठ ते दहा डंपर अडवण्यात आले. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले. या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु होता. डंपर चालकाने ग्रामस्थांची माफी मागावी आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अखेर दुपारनंतर नुकसानभरपाई दिल्यानंतर डंपर सोडून देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com