समतापर्व उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समतापर्व उपक्रम
समतापर्व उपक्रम

समतापर्व उपक्रम

sakal_logo
By

- rat४p३६.jpg ः
९३५८३
खेड ः आयसीएस महाविद्यालयात संविधानचे वाचन करताना डॉ. राजेश राजम.

आयसीएस महाविद्यालयात
समतापर्व उपक्रमांचा प्रारंभ

खेड ः येथील सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आयसीएस महाविद्यालयात समता पर्व उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संविधानाचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. एस. एस. पाटोळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या उपक्रमांतर्गत १ एप्रिल ते १ मे या कालावधीत महाविद्यालयाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे औद्योगिक धोरण, आजचा तरुण आणि आंबेडकरी विचार या विषयांवर २५० ते ३०० शब्दात जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच व्यसनाधीनता, मोबाईलचे व्यसन, पर्यावरण या विषयांवर जिल्हास्तरीय पोस्टरमेकिंग स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यासाठी रोख बक्षिसे विद्यार्थ्यांना प्रदान करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. पी. थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्वांनी ग्रंथालयात जाऊन संविधानाचे वाचन करावे व त्यानुसार आपण आपली कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, हक्क समजून घ्यावेत असे आवाहन केले.
--
फोटो

rat४p३७.jpg ः
९३५८७
तन्वी चव्हाण

मुंबईतील क्रीडा स्पर्धेत
तन्वी चव्हाण हिचे यश

खेड ः मुंबई येथील सोमय्या कॉलेजच्या क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील सुकिवली येथील तन्वी चव्हाण हिने सुयश प्राप्त केले आहे. तिने २०२२-२३ मध्ये झालेल्या कबड्डी व खो-खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमय्या महाविद्यालयाच्या वतीने २०२२-२३ मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या स्टुडन्ट नर्सिंग असोसिएशनची विद्यार्थिनी तन्वी हिने यश संपादन केले. कबड्डी आणि खो-खो स्पर्धेमध्ये तिने प्रथम तर व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. या तिन्ही स्पर्धेतील यशाबद्दल तिचे मुंबई आणि कोकणातील सर्व खेळाडू व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. तन्वी सुकिवली येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक सचिन चव्हाण यांची कन्या आहे.
--
नांदगाव-जाखलवाडीत
आज हनुमान जयंती उत्सव

खेड ः तालुक्यातील नांदगाव-जाखलवाडी येथील श्री हनुमान सेवा मंडळाच्यावतीने उद्या (ता.६) हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहाटे ५ वाजता अभिषेक, ५.३० वाजता प्रदक्षिणा दिंडी, सकाळी ६.३० वाजता श्रींचा जन्मसोहळा, ७ वाजता पूजापाठ, ११ वाजता श्री सत्यनारायणाची पहापूजा, सायंकाळी ४ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ९ वाजता सामाजिक मार्गदर्शक व सत्कार सोहळा व १० वाजता श्री हनुमान सेवा नांदगाव-जाखलवाडी नमन नाट्यमंडळाचा वगनाट्य होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

- rat४p३८.jpg ः
९३५८४
खेड ः शिवसेनेकडून नगर प्रशासनाला निवेदन सादर करताना पदाधिकारी.

खेड शहर शिवसेनेकडून
नगर प्रशासनाला धडक

खेड ः नगर पालिकेत अंदाधुंदी कारभार सुरू असून, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत येथील शिवसेनेचे शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नगर पालिकेला धडक देत जाब विचारण्यात आला. मनमानी कारभाराचा पाढा वाचत येत्या आठ दिवसात कारभारात सुधारणा न झाल्यास नागरिकांसमवेत आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. खेड नगर पालिकेतील मनमानी कारभाराचा शहरातील नागरिकांना फटका बसत आहे. वर्षभरापूर्वी नागरिकांनी तक्रारी करून देखील समस्यांची सोडवणूक करण्याच्यादृष्टीने कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. शहरात कमी दाबाच्या पाणीसमस्येने डोके वर काढले आहे. याबाबत तक्रारी करून देखील नगर प्रशासन दखलच घेत नसल्याचा आरोप सेनेने केला आहे. आठवड्यातील पहिल्याच दिवशी मुख्याधिकारी हर्षदा राणे सोमवारी दुपारपर्यंत कार्यालयात हजर नव्हत्या. ही बाबदेखील सेना कार्यकर्त्यांनी समोर आणली. या वेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक सतीश चिकणे, स्वप्नील सैतवडेकर, बॉबी खेडेकर, दिनेश पुजारी, प्रेमळ चिखले, तुषार सापटे आदी उपस्थित होते.

-