देवगडच्या ‘त्या’ महिलेची संविता आश्रमात रवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडच्या ‘त्या’ महिलेची 
संविता आश्रमात रवानगी
देवगडच्या ‘त्या’ महिलेची संविता आश्रमात रवानगी

देवगडच्या ‘त्या’ महिलेची संविता आश्रमात रवानगी

sakal_logo
By

देवगडच्या ‘त्या’ महिलेची
संविता आश्रमात रवानगी
देवगड, ता. ७ ः येथील देवगड जामसंडे शहरात अवेळी फिरणाऱ्या एका माहिलेस येथील ‘एसडब्यूएफ’ मंडळाच्यावतीने पणदूर (ता. कुडाळ) येथील संविता आश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले. यातून संबंधित महिलेला निवारा मिळाल्याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड जामसंडे परिसरात गेले अनेक महिने ही महिला रस्त्यावर फिरत असल्याने वाहनांना धोकादायक ठरत होते. याबाबत अनेक नागरिकांनी मंडळाकडे या महिलेच्या निवाऱ्यासंदर्भात विनंती केली होती. याबाबत सोशल मीडियावर पोस्टही केली होती. काल (ता. ६) रात्री नऊला जामसंडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक रवींद्र चिंदरकर यांनी या महिलेसंदर्भात संपर्क केला. लगेच पेडणेकर आणि त्यांचा मुलगा रंजन यांनी जामसंडे येथे जाऊन पाहणी केली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात जाऊन त्यांचे पत्रही त्यांनी घेतले. संविता आश्रमचे उदय कामत आश्रमातील दोन महिला कर्मचार्‍यांसह जामसंडे येथे दाखल झाले. शहरांतील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्या महिलेला वाहनात बसवून निवारा व औषधोपचारासाठी संविता आश्रम पणदूर येथे रात्री साडेअकराला पाठविण्यात आले. यासाठी चिंदरकर यांनी मंडळाला सहकार्य केले. संविता आश्रमचे संदीप परब यांच्यासह त्यांचा समूह या संदर्भात कायम सहकार्य करत असतात, असे पेडणेकर यांनी सांगितले.