खेर्डी गावच्या विकासाठी योगेश कदम यांच्या प्रयत्नाने कोट्यवधींचा निधी

खेर्डी गावच्या विकासाठी योगेश कदम यांच्या प्रयत्नाने कोट्यवधींचा निधी

खेर्डीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी

गावतळे, ता. १० ः दापोली मतदार संघातील वाडीवस्त्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे आमदार म्हणून मुख्य कर्तव्य आहे आणि या कर्तव्यात मी कुठेही कसूर करणार नाही. खेर्डी गावाने आजपर्यंत जे विकासाच्या माध्यमातून मागितले ते त्यांना देण्यात मी कुठेही कमी पडलो नसून, खेर्डी गावाच्या विकासाकरिता करोडो रूपयांचा निधी दिला असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.
दापोली तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. जलजीवन मिशन योजनेंतर्गत खेर्डी नळपाणी योजना करणे १ कोटी ९८ लाख, खेर्डी पानवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे ७ लाख, बौद्धवाडी सभामंडप ६ लाख, इंगळवाडी रस्ता डांबरीकरण ५ लाख, कातळवाडी रस्ता डांबरीकरण ७ लाख, मुख्य रस्ता ते करमरकरवाडी रस्ता डांबरीकरण ७ लाख, माळवाडी रस्ता डांबरीकरण ४ लाख, पानवाडी ते बौणडीवली रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण ६५ लाख, भांबिड घर ते चंडिकादेवी रस्ता डांबरीकरण ५ लाख, बौद्धवाडीअंतर्गत रस्ता डांबरीकरण ९ लाख, पांढरीवाडी ते बैकरवाडी रस्त्याचे डांबरीकरण १७ लाख. अशा विविध विकासकामांसाठी खेर्डी गावाकरिता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याचे कदम यांनी सांगितले.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com