सांगेलीत दीड कोटीचे नुकसान

सांगेलीत दीड कोटीचे नुकसान

swt106.jpg
94820
सांगेलीः वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना तहसीलदार अरुण उंडे व अन्य.

सांगेलीत दीड कोटीचे नुकसान
अवकाळीचा फटकाः वीजपुरवठा खंडित, प्रशासनाकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः सांगेली येथे शनिवारी (ता. ८) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात तब्बल दीड कोटीचे नुकसान झाले. या पन्नासहून अधिक घरे आणि मांगराचा समावेश आहे. परिसरातील माड बागायतीही उन्मळून पडली. त्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. सावंतवाडीचे तहसीलदार अरुण उंडे यांनी आज नुकसानीची पाहणी करत संबंधित नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तर नुकसानग्रस्तांना तत्काळ शासनाकडून मदत देण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी सांगेली सरपंच लवू भिंगारे यांनी केली.
वादळी वाऱ्यामुळे सांगेली देवकरवाडी, खालचीवाडी आणि सावंत टेंब आदी परिसरातील घरे आणि मांगरांचे नुकसान झाले. यात शिवराम परब, सखाराम राऊळ, आबा कोचरेकर, उज्ज्वला राणे, अनिल गावडे यांच्यासह देवकरवाडी येथील गुरुनाथ राऊळ यांच्या दुकानाचे आणि रेडीज यांच्या घराचे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा आज महसूल प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी तहसीलदार उंडे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच भिंगारे यांच्यासह ग्रामसेवक कांता जाधव, बाळा राऊळ, उमेश राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, एकनाथ राऊळ, नितीन सांगेलकर, वामन नार्वेकर आदी उपस्थित होते.
याबाबतची माहिती सरपंच भिंगारे यांनी दिली. वादळी वाऱ्यामुळे गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडे उन्मळून पडल्याने वीज खांब तुटले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. तो लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी वीज कंपनीकडे केली आहे. माड बागायतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे, असे भिंगारे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com