गावतळे-वणौशीतर्फे नातूच्या विकासासाठी 74 लाख

गावतळे-वणौशीतर्फे नातूच्या विकासासाठी 74 लाख

वनौशीतर्फे नातूच्या विकासासाठी ७४ लाख

आमदार योगेश कदम ; गावात येणार हर घर नल

गावतळे, ता. १० ः भारतीय राज्यघटनेत लोकशाहीला अनन्यसाधारण महत्व असून घटनेने बहाल केलेल्या अधिकाराचा आमदार म्हणून योग्य वापर करून संपूर्ण दापोली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणार आहे, असे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी केले. ते वनौशीतर्फे नातू येथे ७ एप्रिलला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
वनौशीतर्फे नातू या गावाच्या विकासाकरिता सुमारे ७४ लाख ३४ हजार इतका निधी मंजूर झाला असून, खोतवाडी रस्ता डांबरीकरण ४ लाख, काळकाई देवी मंदिर संरक्षण भिंत ८ लाख आदी कामे आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत.
आमदार कदम म्हणाले, जलजीवन मिशन ''हर घर नल'' या योजनेचा आराखडा तयार होत असताना कोणतेही गाव या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून स्वतः जातिनिशी लक्ष घालून कोणताही पक्षपात न करता दापोली मतदार संघातील सर्व गावे समाविष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारचा ६० टक्के निधी, महाराष्ट्र सरकार ४० टक्के निधी व ग्रामपंचायत लोकवर्गणी १० टक्के अशा स्वरूपात ही नळपाणी योजना राबवली जात आहे. ही योजना गावोगावी होत असताना आपण ग्रामस्थ म्हणून या योजनेचे काम ठेकेदाराकडून जबाबदारीने करून घ्यायचे आहे. कारण, पुढील किमान २५ वर्षात पुन्हा अशी मोठी योजना पाण्यासाठी राबवली जाण्याची शक्यता कमी आहे. विकासकामे देणे ही माझी जबाबदारी आहे; मात्र ती विकासकामे ही आपण अधिकाऱ्यांना, ठेकेदारांना विश्वासात घेऊन योग्य रितीने पूर्ण करून घेण्याचे काम तुमचे आहे. योग्य पद्धतीने आपल्या गावचा विकास साधण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
भारत-पाकिस्तान युद्धात वीरमरण आलेले शहीद विठोबा चव्हाण यांच्या स्मारकाची दुरूस्ती व्हावी म्हणून या वेळी ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे मागणी केली. त्यावर ग्रामपंचायतीचा प्रस्ताव द्या. या स्मारकासाठी त्वरित निधी मंजूर करून देतो, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com