लोकशाही आघाडीला अनेक संघटनांचा पाठिंबा

लोकशाही आघाडीला अनेक संघटनांचा पाठिंबा
Published on

(टुडे पान ३ साठी)

लोकशाही आघाडीला अनेक संघटनांचा पाठिंबा

माध्यमिक सेवक पतपेढी ; ३० एप्रिलला निवडणूक

खेड, ता. १० ः रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ ) प्रणित कास्ट्राईब माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघाने लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक ३० एप्रिलला होणार आहे. जिल्ह्यात आता सर्व शाळांमध्ये प्रचाराला वेग आला आहे. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक जवळपास ६ वर्ष ५ महिन्यांनी जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) प्रणित लोकशाही आघाडी स्थापन झाली आहे. जिल्ह्यातील अनेक संघटनांनी लोकशाही आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा ग्रंथपाल संघ या संघटनांचा समावेश आहे.
---
मुख्याध्यापक संघाचाही पाठिंबा

पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पतपेढीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पूर्ण क्षमतेने लोकशाही आघाडीच्या पाठीशी असल्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी स्पष्ट केले. पतपेढीची ढासळलेली आर्थिक स्थिती केवळ लोकशाही आघाडीच सुधारू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
zp school
zp schools
New Academic Year Kicks Off; Officials to Visit Schools on Day One
Marathi News Esakal
www.esakal.com