रत्नागिरी-रत्नागिरी-8 या वाणाची देशपातळीवर दखल

रत्नागिरी-रत्नागिरी-8 या वाणाची देशपातळीवर दखल

फोटो ओळी
-rat१०p२.jpg ः KOP२३L९४७७५ रत्नागिरी ः शिरगाव कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले रत्नागिरी-८ चे वाण.
----
रत्नागिरी-८ भात वाणाची देशपातळीवर शिफारस

शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे यश ; सहा राज्यांसाठी शिफारस, खासगी कंपन्यांचा विद्यापीठाशी करार
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः कोकण कृषी विद्यापीठ दापोलीअंतर्गत येथील शिरगाव कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या रत्नागिरी-८ ही भाताची जात कोकणासह देशभरात ६ राज्यांमध्ये उत्तरप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरून शिफारस केली जात आहे, तसेच देशातील काही खासगी कंपन्यांनी विद्यापिठाशी करार केल्याची माहिती शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.
रत्नागिरी-८ बी २०१० ही अघिघोषिक धावेवी भाताची जात आहे. सुवर्णा या जातीला पर्याय म्हणून विद्यापीठाने ही जात विकसित केली. रत्नागिरी-८ या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे १३५-१४० दिवसात तयार हेणारी असून, मध्यम बारीक दाणा आहे. चवीला उत्तम आहे. कापणी वेळेवर केली तर अखंड तांदूळ जास्त होऊन तांदूळतुटीचे प्रमाण खूपच कमी येते. मध्यम उंचीचे असल्यामुळे लोळत नाही. करपा किंवा कडा करपा रोगास प्रतिकारक असून, वेळेवर पेरणी व लावणी केल्यास किडीला कमी बळपडते. आजकालच्या बदलत्या हवामानामुळे योग्य असणारी ही जात आहे. कारण, कालावधी १३५-१४० दिवसाचा असल्याने उशिरा पडणाऱ्या पावसाचा फटका बसत नाही.
मागील दोन वर्षे सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यात या बियाण्यांची लागवड करण्यात आली होती. गत खरीप २०२२ या हंगामात या जातीचे ३५ टन बियाणे या दोन जिल्ह्यात रत्नागिरी व फोंडाघाट केंद्रावरून विक्री करण्यात आली होते. रत्नागिरी-८ या भात जातीचे बियाणे मोठ्या प्रमाणावर तयार करून इतर बारीक दाण्याची जात असून, एक हजार दाण्यांचे वजन १६ ते १७ ग्रॅम एवढे आहे. तिचे विद्यापीठ स्तरावर सरारी उत्पन्न ५५ ते ६० क्विंटल प्रति हेक्टरएवढे असले तरी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ८५ ते ९० क्विंटल प्रती हेक्टरएवढे उत्पन्न घेतले आहे.
रत्नागिरी-८ या भात जातीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारणाने गेली दोन वर्षे बियाण्यांची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन कृषी विद्यापिठाने रत्नागिरी आणि कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट-सिंधुदु्र्ग येथे मोठ्या प्रमाणावर बियाणे निर्माण केले आहे. ज्या शेतकऱ्यांना हे बियाणे हवे असल्यास त्यांनी कृषी संशोधन केंद्र, शिरगाव येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट
शेतीची उत्पादकता वाढवली
शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राला २०१३ ला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या केंद्रावरून आतापर्यंत भाताच्या ११ जाती व एक संकरित जात विकसित केली आहे. यामध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२४ आजही लोकप्रिय बियाण्यांची मागणी असणाऱ्या जाती आहेत. रत्नागिरी-१ व आय - २२, २, १०, १ हे वाण जागतिक पातळीवर लागवडीखाली आले आहे. ज्या वेळी अन्नधान्याची कमतरता होती, त्या वेळी रत्नागिरी येथील जातींनी कोकणातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com