जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

-rat१०p२५.jpg-
९४८३१
रत्नागिरी ः मराठी पत्रकार परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आदर्श जिल्हा पुरस्कार खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते स्वीकारताना रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेची टीम.
-
जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचा गौरव

कर्जतमध्ये कार्यक्रम ; आदर्श जिल्हा संघाचा पुरस्कार

रत्नागिरी, ता. १० ः जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. विविध सामाजिक उपक्रम, संघर्षमय पत्रकारिता आदीच दखल घेऊन परिषदेने आदर्श जिल्हा संघाचा पुरस्कार दिला. या पुरस्काराचे वितरण कर्जत (जि. अहमदनगर) येथे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते देण्यात आला तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्याचे विशेष कौतुकही केले.
मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या रंगा आण्णा वैद्य राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेला जाहीर करण्यात आला होता. त्याचे वितरण कर्जत येथे शुक्रवारी (ता. ७) करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने कोरोना काळात चिपळूणमध्ये महापुरावेळी केलेली मदत, पत्रकारांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी केलेली आंदोलने व प्रामुख्याने शशिकांत वारिशे हत्या प्रकरणात केलेला पाठपुरावा व कुटुंबाला मिळवून दिलेली मदत, वांद्री (ता. संगमेशवर) गाव दत्तक घेऊन केलेल्या विकासकामांची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेने यंदाचा रंगा आण्णा वैद्य राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेला जाहीर केला. हा पुरस्कार कर्जत-जामखेड येथे मराठी पत्रकार परिषदेने आयोजित पुरस्कार सोहळा आणि तालुकाध्यक्षांचा मेळावा या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, कोकण संघटक हेमंत वणजू, जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुकाध्यक्ष प्रशांत पवार, प्रसिद्धीप्रमुख जमीर खलफे यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com