११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप

११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप

kan१०२.jpg
94835
कणकवली : येथील ओम गणेश निवासस्थानी ११० सायकलींचे वाटप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)

११० शाळकरी मुलींना
मोफत सायकल वाटप
आमदार नितेश राणे यांचा सामाजिक उपक्रम
कणकवली, ता. १० : कणकवली मतदारसंघातील ११० मुलींना आज मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. ओम गणेश निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. केंद्रीयमंत्री नारायण राणे, नीलम राणे, आमदार नीतेश राणे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सायकलींचे वितरण करण्यात आले.
कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्‍यातील शालेय मुलींसाठी पहिल्‍या टप्प्यात ३८० सायकली उपलब्‍ध झाल्‍या आहेत. त्‍यातील ११० सायकलचे वितरण झाले. तर पुढील दोन दिवसांत उर्वरीत सायकल वाटप होणार असल्‍याची माहिती आमदार नीतेश राणे यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
कणकवली मतदारसंघातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलींसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्‍यावर हा सायकल वाटप कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावेळी जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, संजना सावंत, मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, हर्षदा वाळके, प्रज्ञा ढवण, डॉ. अमोल तेली, संदीप मेस्त्री उपस्थित होते. शाळेचे अंतर घरापासून लांब असल्याने आणि वाहतुकीची गैरसोय असल्याने अनेक शाळकरी मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. आता सायकल उपलब्‍ध झाल्‍याने या विद्यार्थी वेळेत शाळेत आणि शाळेतून घरी जाऊ शकतील. त्‍यांचे उज्जवल भवितव्य घडविण्यासाठी निश्‍चितपणे उपयोग होऊ शकतो असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com