पालकमंत्री चव्हाण आज जिल्ह्यात

पालकमंत्री चव्हाण आज जिल्ह्यात

swt१०१६.jpg
९४८५३
रवींद्र चव्हाण

पालकमंत्री चव्हाण
आज जिल्ह्यात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उद्या (ता. ११) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सांगेली येथे वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची सकाळी पाहणी करणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रशासकीय बैठका घेणार आहेत.
पालकमंत्र्यांचा दौरा असाः सकाळी ९.३० वाजता सांगेली येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी, १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या समवेत बैठक, १०.१५ वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक, १०.३० वाजता जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत बैठक, सकाळी १०.४५ वाजता महावितरण व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत अवकाळी पाऊस व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनेसंदर्भात बैठक, ११ वाजता सार्वजनिक वितरण प्रणाली संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समवेत बैठक, ११.१५ वाजता जिल्हा वन अधिकारी यांच्या समवेत बैठक, ११.३० वाजता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या समवेत आढावा बैठक, ११.४५ वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक, दुपारी १२ वाजता सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (सिंधुदुर्ग) यांच्या समवेत बैठक, १२.३० वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस निरीक्षक यांच्या समवेत बैठक, १ वाजता दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळा, नवीन वास्तू उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, १.३० ते ४ राखीव, सायंकाळी ५ वाजता कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सायंकाळी ७ वाजता कुडाळ येथून दाबोलिम विमानतळ, गोवाकडे प्रयाण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com