जंगल अतिक्रमित धारकांची सावंतवाडीत उद्या परिषद

जंगल अतिक्रमित धारकांची सावंतवाडीत उद्या परिषद

जंगल अतिक्रमित धारकांची
सावंतवाडीत उद्या परिषद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या, जंगल जमिनीवर घरे बांधलेल्या, जंगल जमिनी कसून उदरनिर्वाह करणाऱ्या, जंगलावर ज्यांचे जगणे अवलंबून आहे, अशा बेरड, धनगर, ठाकर, कातकरी आणि कुणबी कुटुंबांची वन हक्क परिषद बुधवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता येथील नवसरणी येथे होणार आहे. या परिषदेत संपत देसाई, अंकुश कदम, प्रा. अविनाश भाले यांच्यासह या क्षेत्रात काम केलेले अन्य मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यांसह जिल्ह्यातील जंगल अतिक्रमित धारकांनी परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे निमंत्रक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वन हक्काचा कायदा होऊन १८ वर्षे झाली, पण जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत या कायद्याची अंमलबजावणी होऊन २००५ पूर्वी अतिक्रमण असलेल्या जंगल जमिनी सातबाऱ्यासह लोकांच्या ताब्यात दिल्या आहेत. ज्या गावांना जंगलामुळे वीज, पाणी, रस्ता मिळण्यासाठी अडचण होती, त्यांनाही सामूहिक वन हक्काच्या आधारे सुविधा मिळाल्या आहेत. जंगलातील उपजावर जंगलात राहणाऱ्या लोकांचे पारंपरिक अधिकार मिळाले आहेत, पण जिल्ह्यात हे झाले नसल्याने या परिषदेत याच्या अंमलबजावणीबाबत दिशा निश्चित केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com