सलग तिसऱ्या दिवशी पाऊस

सलग तिसऱ्या दिवशी पाऊस

सह्याद्री पट्ट्यात सलग पाऊस
कनेडी : परिसराला वळवाच्या पावसाचा दणका सातत्याने सहन करावा लागत आहे. सह्याद्री पट्ट्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. आज काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. पावसामुळे आंबा, काजू, कोकण, जांभूळ, करवंद पिकांचे नुकसान झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, वाढलेली उष्णता आणि सायंकाळी पाऊस असा वातावरणात सातत्याने बदल होत आहे. पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न निमार्ण होत आहे. खरीप हंगामातील भातशेतीच्या मशागतीचे काम पुढे गेले आहे. घरांच्या छप्पर दुरुस्तीची कामे पावसामुळे रखडत आहे. त्यामुळे वळव्याच्या पावासाचा फटका ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com