गुहागर ः उदय सामंत व शिवसेना पक्षाला पाठिंबा

गुहागर ः उदय सामंत व शिवसेना पक्षाला पाठिंबा

भातगाव-गोळेवाडी ग्रामस्थांचा
शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा
विकास कामांना निधी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्‍वासन
गुहागर, ता. १० ः गुहागर तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत खऱ्या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवून दिल्यानंतर जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात प्रवेश सुरू झाले आहे, असे चित्र पाहावयास मिळते.
भातगाव गोळेवाडी येथील ग्रामस्थांनी एकमताने पालकमंत्री सामंत व शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम असल्याचा ठराव करत आश्वासन दिले. गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांच्या उपस्थितीत भातगाव गोळेवाडी ग्रामस्थांनी बैठक घेऊन 12 वर्षापासूनच्या विकासकामांच्या व्यथा मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने अवघ्या दीड किमी लांबीच्या रस्त्याला खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळोवेळी भेटी घेऊन निवेदने दिली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत या रस्त्याच्या कामाचे आश्वासन दिले जात होते; परंतु काम काही तब्बल 12 वर्षे झाले नाही. या रस्त्यामुळे येथील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रुग्ण वा गरोदर महिलांना दवाखान्यात जाण्याकरिता हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे तर विद्यार्थ्यांनाही दीड किमी अंतर पूर्ण डोंगर चढून जावे लागते आहे. याचबरोबर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीचा स्लॅब गळत असल्याने विद्यार्थी शाळेत बसता येत नाहीत. त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे तर पाण्यासाठीसुद्धा दगदग होत आहे. ही सर्व कामे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण करू असे आश्वासन तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी दिले. या वेळी गावातील शंकर ठोंबरे, विनायक ठोबंरे, रमेश ठोंबरे, रवींद्र ठोंबरे, विठ्ठल दुर्गवली, सुभाष मते, संतोष भुवड, अनंत दुर्गवली, समीर रानडे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com