हडपीडला उद्यापासून नामस्मरण सप्ताह

हडपीडला उद्यापासून नामस्मरण सप्ताह

swt१०२३.jpg
९४९१६
हडपीडः स्वामी समर्थ मठ

हडपीडला उद्यापासून नामस्मरण सप्ताह
नांदगावः श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड (ता. देवगड) येथे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ''श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ'' ह्या पवित्र नामस्मरण सप्ताहास प्रारंभ होणार आहे. प्रत्येक दिवशी नामस्मरण जपास बसणाऱ्या भक्तांना महाप्रसाद मिळणार आहे. स्वामीभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा. इच्छुकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ हडपीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
................
देवगडात बागायतदार सुखावले
देवगडः तालुक्याच्या किनारपट्टी भागात उष्णता वाढली आहे. किनारी भागात अवकाळी पावसाची लक्षणे दिसत होती, मात्र पाऊस झाला नाही. पाऊस पडला नसल्याने आंबा बागायतदार काहीसे सुखावले आहेत. किनार्‍यापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरील गावात मध्यंतरी पावसाने हजेरी लावली होती. येथील किनारी भागात गेल्या दोन दिवसांपासून वाढता उकाडा आहे. यामुळे दुपारच्यावेळी रस्त्यावरील वर्दळ मंदावलेली असते. अचानक उकाडा वाढल्याने पाऊस पडण्याची लक्षणे होती. किनारी भागात ढगाळ वातावरण होते; मात्र पाऊस झालेला नाही. तालुक्यातील शिरगाव परिसरातील गावांत पाऊस पडल्याचे सांगण्यात येते. किनारी भागात पाऊस पडला नसल्याने आंबा बागायतदारांच्या दृष्टीने हितावह बाब ठरत आहे. पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान होण्याचा धोका असतो. सततच्या पावसाने फळबाजारातील दरात मोठी घसरण होण्याची भीती असते; मात्र पाऊस पडला नसल्याने आंबा बागायतदार काहीसे सुखावले असले तरी अजूनही पावसाची टांगती तलवार आहे. उकाडा वाढू लागल्याने अनेकजण उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. थंडपेय, रसवंतीगृहे यांना पसंती वाढत आहे.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com