सचिन कारेकरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

सचिन कारेकरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

-rat१०p३८.jpg-
९४९१४
सचिन कारेकर
-
शेतकरी सचिन कारेकरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

गुहागर, ता. १० ः गेली २० वर्षे राबून आणि सातत्य राखून आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना त्यांनी संशोधित केलेल्या एस के -४ (स्पेशल कोकण -४) या हळदीच्या वाणाबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांचा यथोचित सन्मान केला.
कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या साहाय्याने शेतीमध्ये विविध प्रयोग करताना SK-४ (स्पेशल कोकण -४) या हळदीच्या वाणाला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. नवोपक्रम आणि उद्योजकतेचा उत्सव या उपक्रमांतर्गत नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून सचिन कारेकर यांच्या कृषी क्षेत्रातील तळागाळातील संशोधनाबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com