गोशाळा जागेसाठी कोकरेंचे उपोषण सुरू

गोशाळा जागेसाठी कोकरेंचे उपोषण सुरू

(पान ३ साठी)

गोशाळा जागेसाठी कोकरेंचे उपोषण सुरू

जागेचा प्रश्न प्रलंबित ; शासनाने दिलेले आश्वासन हवेत

चिपळूण, ता. १० ः खेड तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थान सांलित गोशाळा या जागाप्रश्न न सुटल्याने या गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे यांनी सोमवारपासून (ता. १०) उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
या गोशाळेत सध्या ११०० गाई आहेत. सध्या त्यांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कीर्तनसेवेतून या गाईंची सेवा केली जाते; मात्र त्यांचा दिवसाचा खर्च ६० हजारांच्या आसपास जातो. त्यामुळे हा खर्च परवडत नसून, गेल्या दोन वर्षापासून शासनाने कुठलीही मदत दिलेली नाही. गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत जाहीर अनुदानातील शेवटचा हप्ताही अजून मिळालेला नाही. त्यामुळे अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यात गेल्या अनेक वर्षापासून या गोशाळेसाठी जागा मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तोही सुटत नाही. यासाठी फेब्रुवारी महिन्यात उपोषण केल्यानंतर शासनस्तरावरून जागा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचे पालन झाले नसल्याने पुन्हा उपोषण करण्याचे कोकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार हे उपोषण सुरू झाले आहे. या उपोषणात जयश्री कोकरे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत. अनेकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. राज्य वारकरी संप्रदायाचे प्रमुख बंड्यातात्या कराडकर यांनी गोशाळेला मदत आणि जागा प्रश्न का सोडवत नाही, असा प्रश्न पत्राद्वारे शासनाला केला आहे. तसे कोकरे यांना पत्र पाठवून उपोषणाला पाठिंबा असल्याचे कळवले आहे.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com