नांदगाव तिठा उर्दू शाळेस बेंच प्रदान

नांदगाव तिठा उर्दू शाळेस बेंच प्रदान

swt1026.jpg
94934
नांदगावः येथील उर्दू शाळेत बॅंचेस प्रदान करताना मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी.

नांदगाव तिठा उर्दू शाळेस बेंच प्रदान
भाजपचा पुढाकारः नारायण राणेंच्या वाढदिनी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १०ः केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. आमदार नीतेश राणेंमार्फत नांदगाव तिठा येथील उर्दू शाळा येथे बँचेस प्रदान करण्यात आले.
आमदार राणेंनी नांदगाव दौऱ्यावेळी उर्दू शाळा येथे भेट दिली होती. यावेळी शाळेतील बँचेसच्या गैरसोयीबाबत त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. काही दिवसांत बँचेस दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता आजकेंद्रीय मंत्री राणे यांच्या वाढदिनी करून येथील प्रशालेत बँचेस प्रदान करण्यात आले. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त आहे. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, महिला तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके, अहमद बटवाले, माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, माजी उपसरपंच नीरज मोरये, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संतोष जाधव, राजू खोत, राजू तांबे, मारुती मोरये, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अक्षता खोत, अनिकेत तांबे, नमिता मोरये, रमिजान बटवाले, रज्जाक बटवाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अल्लाउद्दीन बोबडे, जाफर कुणकेरकर, मुख्याध्यापक मुंगी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी केंद्रीयमंत्री राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नांदगाव गावाच्या विकासासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com