चौके खून प्रकरणी तिघांना पोलिस कोठडी

चौके खून प्रकरणी तिघांना पोलिस कोठडी

चौके खून प्रकरणी तिघांना कोठडी
मालवण, ता. १० : दीपक वामन येंडे यांच्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या गणेश कृष्णा गावडे, अनाजी उर्फ बबरी कृष्णा गावडे (दोघे रा. चौके मालवण) व मारुती भिवा खांडेकर (रा. कसाल) यांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले.चौके माळरानावर दीपक येंडे यांना मारहाण केली होती. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तिन्ही संशयितांना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय यादव करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com