17 पर्यंत इमारतीवरील ''ते'' नाव हटवा

17 पर्यंत इमारतीवरील ''ते'' नाव हटवा

swt१०३२.jpg
94960
कुडाळः पत्रकार परिषदेत बोलताना अभय शिरसाट, ओंकार तेली, धीरज परब, राजन नाईक, सुनील भोगटे आदी.

इमारतीवरील ‘ते’ नाव १७ पूर्वी हटवा
संघर्ष समितीः कुडाळ हायस्कूल नामांतरप्रश्नी संस्थेस इशारा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः येत्या १७ एप्रिलपर्यंत कुडाळ इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीवर लावलेले व्यक्तीचे नाव हटवून ते नाव कागदोपत्री कमी करण्याचा प्रस्ताव करावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे. आम्ही ते नाव १७ नंतर केव्हाही खाली उतरवू, असा इशारा कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकांना कुडाळ इंग्लिश मीडियम संघर्ष समितीचे अभय शिरसाट व ओंकार तेली यांनी दिला. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद शिरसाट यांनी घेतली. यावेळी ओंकार तेली, धीरज परब, राजन नाईक, सुनील भोगटे, विजय प्रभू, संदेश पडते, संजय भोगटे, दादा पडते, राकेश वर्दम, रवी राऊळ, अमेय पेडणेकर, उमेश परब, शैलेश घोगळे, रमाकांत नाईक, मंदार शिरसाट, नितीन माडेश्वर, अमित राणे, निविश शिरसाट, सागर माळकर, कृष्णा तेली, स्वरूप सावंत, प्रसाद कोरगावकर उपस्थित होते.
यावेळी शिरसाट म्हणाले, ‘‘दोन वर्षांपूर्वी२०१९ मध्ये कुडाळ इंग्लिश मीडियमला एका व्यक्तीचे नाव देण्यात आले. त्या व्यक्तीबद्दल एका निनावी पत्राद्वारे त्यांचा बदनामकारक मजकूर आल्यानंतर कुडाळ मारुती मंदिर धर्मशाळेमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. १ एप्रिल २०१९ ला शहरातील जनतेने कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकांची भेट घेत भूमिका मांडून व्यक्तीचे दिलेले नाव तत्काळ खाली करण्याची मागणी केली. त्यावेळी संचालकांनी ते नाव कायमस्वरूपी झाकून ठेवू आणि भविष्यात नाव द्यायचे असल्यास आपल्याशी चर्चा केल्याशिवाय देणार नाही, अशी लेखी हमी दिली होती; परंतु २ एप्रिलला आमच्यातील काही जणांना संचालकांचा फोन आला व शाळेच्या नामांतराचा कार्यक्रम ८ एप्रिलला असल्याचे सांगितले. त्यानंतर ३ एप्रिलला आम्ही कुडाळवासींनी नामांतर कार्यक्रमास विरोध दर्शविण्यासंदर्भात मारुती मंदिर धर्मशाळा येथे बैठक घेत आंदोलनाची दिशा ठरविली. ४ एप्रिलला संचालकांची भेट घेतली. यावेळी संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने दोन तास ठिय्या आंदोलन छेडले.
या आंदोलनाचे नियोजन करून दुसऱ्या दिवशी शाळेच्या किती इमारती अधिकृत आहेत, या संदर्भात सर्व माहिती नगरपंचायतीकडून घेतली. त्यानंतर सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बाळराजे भोसलेंची भेट घेत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी स्वतः लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन ८ एप्रिलला कार्यक्रम असलेली इमारत अनधिकृत असून उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहु नये, अशी विनंती केली. त्यांनीही प्रतिसाद देत उपस्थित न राहण्याची ग्वाही दिली. आता तो कार्यक्रम पुढे ढकलला असल्याची माहिती मिळत आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘८ एप्रिलला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या प्रवेशद्वारावर सह्यांची मोहीम राबवली. यावेळी सुमारे १ हजार २०० पालक, ग्रामस्थ व आजी-माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी (ता. ९) सर्व संस्था चालकांची त्यांच्या घरी भेट घेत त्यांना निवेदन दिले. व्यक्तीचे नाव देण्याचा अट्टाहास सोडून कुडाळ इंग्लिश मीडियमला वेगवेगळी नावे देऊन तुकडे पाडू नका, असे आवाहन केले. मुंबई-कुर्ला येथील संस्था चालकांनाही ई-मेलद्वारे निवेदन पाठविले. १७ एप्रिलपर्यंत संचालकांनी शाळेवर लावलेले नाव खाली उतरविले नाही तसेच कागदोपत्री नाव बदलण्याचा प्रस्ताव न केल्यास आम्ही ग्रामस्थ ते नाव खाली उतरवू. जोपर्यंत कागदोपत्री व्यक्तीचे दिलेले नाव कायमचे काढले जात नाही, तोपर्यंत आमची आंदोलनाची भूमिका कायम राहणार आहे.’’
यावेळी तेली यांनी, संस्था चालकांनी १७ पर्यंत नाव खाली न उतरविल्यास संघर्ष अटळ आहे. अॅड. सुहास सावंत आमच्यासोबत असून त्यांच्यामार्फत कायदेशीर लढाई लढू, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com