देवरूख कुंडी रस्त्याचे काम
बातमी क्र. २६ (संक्षिप्त, ५ साठी)
देवरूख कुंडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
साडवली ः देवरूख कुंडी रस्ता डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असून बांधकाम विभागाने यात वेळीच लक्ष घालावे, अशी मागणी संगमेश्वर तालुका मनसेचे उपतालुकाप्रमुख नित्यानंद देसाई यांनी केली आहे. मुळात हा रस्ता तयार होत असताना यात डांबराचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून जाणार आहे. जनतेची नुसती दिशाभूल होत आहे. या कामात बांधकाम विभागाने लक्ष न घातल्यास रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा नित्यानंद देसाई यांनी दिला आहे.
--
चिपळुणात २३ रोजी उद्योजक मेळावा
चिपळूण ः चिपळूण आजी-माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि दे आसरा फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी (ता. २३) सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती द आसरा फाउंडेशनचे नितीश कुलकर्णी व पतसंस्थेचे सुरेश शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कुलकर्णी म्हणाले, व्यवसायात मोठी झेप घ्यायची असेल तर केवळ पारंपरिक मार्गाने न जाता त्यात बदल करत नव्या गोष्टी शिकत पुढे जाण्याची गरज आहे. या मार्गदर्शनाचा छोटे-मोठे उद्योजक आणि खासकरून महिला बचतगट उद्योजकांना फायदा होणार आहे. उद्योग व्यवसाय कसा वाढवावा? बदलत्या गरजा लक्षात घेऊन काय उपाययोजना कराव्यात? आपल्या व्यवसायाचे प्रभावीपणे मार्केटिंग कसे करावे? या विषयावर आसरा फाउंडेशनचे तज्ञ मार्गदर्शक करणार आहेत. यामध्ये दे आसरा फाउंडेशनचे व्यवसाय वृद्धी सल्लागार राहुल लिमये व्यवसायसंदर्भात तर प्रोग्राम मॅनेजर प्रकाश आगाशे शासकीय कर्जयोजनेसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी चिपळूण आजी-माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे सुरेश शिंदे, फाउंडेशनचे प्रोग्राम मॅनेजर प्रकाश आगाशे आदी उपस्थित होते.
-
rat१५p१८.jpg ः
९६१४३
मंडणगड ः एसटी बससेवेसाठी प्रादेशिक महाव्यवस्थापकांना निवेदन देताना वैभव बहुतुले, ओमकार माळगांवकर आदी.
नाशिक-पुणेमार्गे मंडणगडला एसटी सुरू करा
मंडणगड ः नाशिक-पुणेमार्गे मंडणगड एसटी बससेवा कायमस्वरूपी सुरू करा अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले, संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांनी प्रादेशिक महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप यांच्याकडे केली आहे. मंडणगड हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण आहे. येथे नाशिक व अन्य परिसरातील अनेक नागरिक शिक्षण, निमशासकीय व शासकीय नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यानिमित्त नाशिक, पुणे, मंचर, नारायणगाव, भोसरी, सिन्नर, आळेफाटा, मंडणगड येथे कार्यरत आहेत. मंडणगड येथील नागरिकांना नाशिक, सिन्नर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, भोसरी, पुणे येथे येण्या-जाण्यासाठी पुरेशी बससेवा नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागतो. त्यासाठी बससेवा सुरू केल्यास ओझर येथील विघ्नहर्ता गणपतीला जाण्यासाठी सोय होईल. तसेच एसटी महामंडळाच्या उत्पन्न-प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी मागणी बहुतुले यांनी केली.
--
संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकावर थांबा द्या
रत्नागिरी ः नेत्रावती व मत्स्यगंधा या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, यासाठी गेली तीन वर्षे संगमेश्वरवासीय आणि कार्यकर्ते लढा देत आहेत; मात्र, या प्रश्नासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेतला जात नाही. त्यासाठी रेल्वे राज्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावण्यात येत आहेत. बैठक घेण्याबाबत प्रतिसाद मिळाला नाही तर रेल रोको आंदोलनाचा पर्याय अवलंबला जाणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोकण रेल्वे प्रशासन ते रेल्वेमंत्री, पंतप्रधान कार्यालयापर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला आहे; पण अद्याप आम्हाला सकारात्मक उत्तर मिळाले नाही. कोकण रेल्वेकडून साचेबंद उत्तरे दिले जाते, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एक्स्प्रेस गाड्यांमधील नेत्रावतीला संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकात महिन्यातील २३ ते २४ दिवस तांत्रिक थांबा असतो. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या चर्चगेट मुंबई येथील जनशिकायत कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात विनंती अर्ज करण्यात आले आहेत. दिल्ली येथील कार्यालयातही हजारो विनंती अर्ज पाठवले आहेत. तिन वर्षे सातत्याने पत्रव्यवहार करूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने रेल्वे राज्यमंत्र्यांनी तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.