बाजार समितीवर गजानन पाटील बिनविरोध

बाजार समितीवर गजानन पाटील बिनविरोध

३६ (पान ५ साठी)


- rat२१p१४.jpg-
९७५८१
रत्नागिरी ः निवडून आल्याचे पत्र स्वीकारताना गजानन पाटील.
--
बाजार समितीवर गजानन पाटील बिनविरोध

सहकार पॅनेल ; सलग तिसऱ्‍यावेळी झाली निवड

रत्नागिरी, ता. २२ : जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी सभापती तथा संचालक गजानन कमलाकर पाटील तथा आबा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सहकार पॅनेलच्या माध्यमातून गजानन पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मोजक्या जागेसाठी असलेल्या या निवडणुकीत यावर्षी अनेकांनी अर्ज सादर केल्याने चुरस वाढली होती. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. गजानन पाटील यांनी इतर मागास वर्ग या मतदारसंघातून फॉर्म भरल्यानंतर त्यांच्यासमोर तब्बल चार उमेदवारांनी आपापले अर्ज सादर करत आव्हान उभे केले होते. मात्र विरोधातील चारही उमेदवारांना अर्ज मागे घेतले. त्यामुळे गजानन पाटील यांची निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्‍यांनी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
गजानन पाटील हे तिसऱ्‍यांदा बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आल्याने त्यांच्या मागील अनेक वर्षाच्या अनुभवाचा फायदा बाजार समितीच्या कामकाजात होईल. याप्रसंगी पाटील म्हणाले, भविष्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्न करून शेतकऱ्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणार असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com